24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरक्राईमनामासंदेशखाली प्रकरणी तक्रारी दाखल करण्यासाठी सीबीआयकडून विशेष ई-मेल जारी

संदेशखाली प्रकरणी तक्रारी दाखल करण्यासाठी सीबीआयकडून विशेष ई-मेल जारी

पीडितांना तक्रारी नोंदवण्याचं आवाहन

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे. या घटनेची वाच्यता होताच अवघा देश हादरून गेला होता. या संदेशखाली प्रकरणामध्ये आता एक मोठी घडामोड समोर आली आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून या तपास यंत्रणेने या प्रकरणात एक वेगळं मेल आयडी तयार केला आहे. जेणेकरून आणखी काही पीडित असतील त्यांना या ई-मेलवर तक्रारी नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

संदेशखाली प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयला महत्त्वाचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून सीबीआयने संदेशखाली प्रकरणी तक्रारी स्विकारण्यासाठी sandeshkhali@cbi.gov.in हा विशेष ई-मेल तयार केला आहे. या ई-मेलवर नॉर्थ २४ परगाना जिल्ह्यातील संदेशखलीतील रहिवाशांना तक्रारी दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. १० एप्रिल २०२४ रोजी कोलकाता हायकोर्टाच्या विभागीय खंडपीठानं यासंदर्भात सीबीआयला निर्देश दिले होते. तसेच नॉर्थ २४ परगाना जिल्ह्याचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी सीबीआयला विनंती केली होती की, हा ईमेल आयडी स्थानिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्याची प्रसिद्धी देखील केली जावी.

हे ही वाचा:

विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी; रब्बी, उन्हाळी पिकांचे नुकसान

मध्य पूर्वेकडील देशांवर युद्धाचे सावट

सहा विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर हरयाणा शाळेला नोटीस

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, रोहन गुप्ता यांचा भाजपमध्ये प्रवेश!

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेशखाली येथील पीडित महिलांकडून त्यांच्या जमिनी बळकावणे आणि लैंगिक अत्याचाराच्या १८ तक्रारी आल्या आहेत. यामध्ये दोन तक्रारी या बलात्काराच्या आहेत. अनेक वर्षांपासून संदेशखालीत हा प्रकार सुरु होता त्यामुळं इथल्या महिला भीतीच्या सावटाखाली जगत होत्या. पश्चिम बंगालमधील नेता आणि तृणमूल काँग्रेसचा आमदार शहाजहाँ शेख आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून संदेशखाली या गावातील दलित महिलांच्या जमिनी धमकावून बळकावल्या तसेच त्यांच्यावर लैंगिक अत्याचारही केले. शहाजहाँ याच्यावर कलम १४७, १४८, १४९, ३५३, ४२७, ३२३, ५०६, ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो ५५ दिवस फरार होता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा