पोलिसांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांसाठी आता ‘ही’ समिती

पोलिसांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांसाठी आता ‘ही’ समिती

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे आणि कोपरी पोलीस ठाण्यात परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकारी यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हयांसाठी आता स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे.

पोलिसांवरील गुन्ह्यांसाठी आता विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त दर्जाचे दोन अधिकारी या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत. दरम्यान गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आलेली असून त्यांच्या बदल्या सशस्त्र विभाग नायगाव येथे करण्यात आलेल्या आहेत.

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण ,सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत शिंदे, युनिट ९चे तत्कालीन प्रभारी नंदकुमार गोपाळे, पोलीस निरीक्षक आशा कोरके, संजय पाटील यांच्यासह बांधकाम व्यवसायिक संजय पुनमिया, सुनील जैन यांच्याविरुद्ध ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून, खंडणी वसूल करण्यात आली होती, तसेच बोगस कागदपत्रांच्या आधारावर बळजबरी माझी जमीन स्वतःच्या नावावर करून घेण्यात आली असा आरोप श्यामसुंदर अग्रवाल याने तक्रारीत केला होता.

याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात खंडणी, मारहाण करणे, धमकी देणे, फसवणूक, बोगस दस्तावेज तयार करून जमीन हडपणे या कलमाखाली परमबीर सिंग यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात पोलिसानी संजय पुनामिया आणि सुनील जैन या दोघांना अटक देखील केली होती. त्याच दिवशी रात्री ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात श्यामसुंदर अग्रवाल यांचा पुतण्या शुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त पराग मनेरे, मनोज घोटकर, संजय पुनामिया आणि सुनील जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही गुन्हे एकमेकांशी संबंधित असल्यामुळे तसेच दोन्ही गुन्ह्यात पोलीस अधिकारी यांचा समावेश असल्यामुळे या गुन्ह्याचा तपासासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

भारताचे ‘भूत’ काढणार ‘साहेबांचा’ धूर

म्हाडाच्या घराचे विजेतेच गायब झालेत!

देवेंद्र फडणवीसांनी पुसले पूरग्रस्तांचे अश्रु

माहितीच्या अधिकारात आमदार साटम यांना काय सापडले?

हे दोन्ही गुन्हे एकत्रित करून गुन्ह्याचा तपास एसआयटी करणार आहे. या एसआयटी मध्ये दोन पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी तसेच एसीपीसह ८ जणांचे पथक असणार आहे. एसआयटी बनवण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी यांची त्याच्या जागेवरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे.

पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अकबर पठाण, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मनेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धार्थ शिंदे, संजय पाटील, मपोनी. आशा कोरके यांची नायगाव सशस्त्र विभाग येथे बदली करण्यात आलेली असून गुन्हे शाखा १चा अतिरिक्त पदभार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्याकडे देण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभार पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्यावर सोपवण्यात आला आहे.

Exit mobile version