मणिपूरमध्ये जप्त केलेल्या शस्त्रांत मस्क यांच्या स्पेसेक्स स्टारलिंकचे डिव्हाइस

इम्फाळमध्ये छापेमारी दरम्यान शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांसह इंटरनेट उपकरणे जप्त

मणिपूरमध्ये जप्त केलेल्या शस्त्रांत मस्क यांच्या स्पेसेक्स स्टारलिंकचे डिव्हाइस

सुरक्षा दलांनी मणिपूरमधील इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील केराव खुनौ येथे छापा टाकून काही शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांसह इंटरनेट उपकरणे जप्त केली आहेत. या जप्त केलेल्या गोष्टींमध्ये स्नायपर, रायफल, पिस्तूल, ग्रेनेड आणि स्टारलिंक इंटरनेट उपकरणे यांचा समावेश आहे. शस्त्रांसोबत सापडलेल्या स्टारलिंक सॅटेलाईट ब्रॉडबँड कम्युनिकेशन डिव्हाईसमुळे सुरक्षा दलाला मोठा धक्का बसला असून खळबळ उडाली आहे. मणिपूरच्या संघर्षग्रस्त भागातून भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सला घुसखोरांच्या तळावरून एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या स्टारलिंकचे इंटरनेट डिव्हाईस सापडले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा, लष्कर आणि पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.

स्टारलिंक कोणत्याही दुर्गम भागात वायर किंवा टॉवरशिवाय इंटरनेट सुविधा पुरवते. यामुळे इंटरनेट थेट सॅटेलाईवरून उपलब्ध आहे. ते एनक्रिप्टेड असून हॅक करणे कठीण आहे. स्टारलिंकला अद्याप भारतात ब्रॉडबँड परवाना मिळालेला नाही. त्यामुळे मणिपूरमध्ये ही उपकरणे आली कुठून आले असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोध मोहिमेदरम्यान इंफाळ पूर्व जिल्ह्यातील केराव खुनौ येथून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये एक एमए ४ असॉल्ट रायफल, एक १२ बोअरची बंदूक, एक ९ एमएम पिस्तूल, एक पॉईंट ३२ पिस्तूल, पाच हातबॉम्ब, पाच आर्मिंग रिंग, दोन डिटोनेटर, ५.५६ एमएम दारुगोळ्याच्या ३० राउंड, इंटरनेट सॅटेलाइट अँटेना आणि इंटरनेट सॅटेलाइट राउटर यांचा समावेश आहे. एके ठिकाणी सुरक्षा दलाला झडतीदरम्यान एक रिसीव्हर, २० मीटर लांबीची केबल आणि एक राउटर सापडला आहे. त्या डिव्हाईसच्या राउटरवर RFP/PLA लिहिले होते.

हे ही वाचा : 

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये सापडले शिवमंदिर; काय आहे इतिहास?

दुसऱ्या दिवशी सभागृहात आलेले उद्धव म्हणाले, मोदीही सभागृहात येत नाहीत!

संभलमध्ये सापडलेल्या मंदिराजवळची अनधिकृत घरे लोक स्वतःच का पाडतायत?

सौदी अरेबियाच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने त्यांच्याकडील ४,३०० भिकाऱ्यांना टाकले नो फ्लाय लिस्टमध्ये

दरम्यान, मणिपूरमध्ये स्टारलिंकची उपकरणे सापडल्यानंतर एलॉन मस्क यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. एलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, “हे खोटे आहे. Starlink सॅटेलाइट बीम भारतावर बंद आहेत.” त्यामुळे आपले डिव्हाईस मणिपूरमध्ये वापरले जात असल्याचे दावे मस्क यांनी फेटाळून लावले आहेत.

Exit mobile version