वरळी स्पामध्ये झाली होती खबऱ्याची हत्या; स्पा मालकाला अटक, तीन जण ताब्यात

मोठ्या रकमा उकळत असल्यामुळे कायमचा काटा दूर करण्यासाठी केली हत्या

वरळी स्पामध्ये झाली होती खबऱ्याची हत्या; स्पा मालकाला अटक, तीन जण ताब्यात

वरळीतील स्पा मध्ये झालेल्या पोलीस खबरी गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे हत्येप्रकरणी स्पा मालकाला अटक करण्यात आली असून एकाला ठाण्यातून तर तीन जणांना राज्याबाहेरून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.वरळी पोलिसांनी अटक केलेल्या स्पा मालकाला गुरुवारी शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ३० जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. स्पा संदर्भात सतत आरटीआय टाकून स्पा मालकांना त्रास देत असल्याच्या संशयावरून गुरूच्या हत्येची सुपारी देऊन ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

संतोष शेरेगर असे अटक करण्यात आलेल्या स्पा मालकाचे नाव असून त्याला वरळी पोलिसांनी अटक केली आहे . तसेच मुंबई गुन्हे शाखेने मोहम्मद फिरोज अन्सारी याला नालासोपारा आणि राजस्थान कोटा येथून साकीब अन्सारी आणि इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची बुधवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास स्पा मध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणी समोर दोन जणांनी हत्या केली होती. विलेपार्ले येथे राहणारा वाघमारे हा आरटीआय कार्यकर्ता आणि पोलीस खबरी होता, मुंबईतील स्पा संदर्भात आरटीआय टाकून स्पा मालकांना त्रास देत असल्यामुळे त्याच्या हत्येची सुपारी शेरेगर याने दिली होती अशी माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा:

ऑलिम्पिक २०२४; भारतीय महिला तिरंदाजी संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश !

विमानतळावर अधिकाऱ्याना मारहाण केल्याप्रकरणी मुस्लीम समुदायातील चौघांना अटक

मूळची हिंदू असलेली सपना झाली रक्षंदा खान, करू लागली मेकअपच्या नावावर धर्मांतरण

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल, अशोक हॉल आता ‘गणतंत्र मंडप’ आणि ‘अशोक मंडप’

या हत्येप्रकरणी वरळी पोलिसांनी या तरुणीला आणि स्पा मालक संतोष शेरेगर सायंकाळी ताब्यात घेऊन कसून चौकशीत शेरेगर याने हत्येची सुपारी दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. दरम्यान मुंबई गुन्हे शाखेने नालासोपारा येथून मोहम्मद फिरोज याला तर राजस्थान कोटा येथून साकीब अन्सारी आणि इतर दोन जणांना राजस्थान कोटा येथून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून या संशयिताना मुंबईत आणण्यात येत आहे. मुंबईतील ‘स्पा’ची माहिती काढण्यासाठी वाघमारे हा सतत आरटीआय टाकून स्पा मालकांना त्रास देत होता, तसेच त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळत असल्यामुळे कायमचा काटा दूर करण्यासाठी त्याच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version