30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामासोनू सूदने केलाय २० कोटींचा करघोटाळा

सोनू सूदने केलाय २० कोटींचा करघोटाळा

Google News Follow

Related

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शनिवारी आरोप केला की, अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी २० कोटी रुपयांची करचुकवेगिरी केली आहे. बोर्डाने असेही आरोप केले की जेव्हा आयकर विभागाने त्याच्या आणि लखनऊमध्ये त्याच्याशी संलग्न असलेल्या जागेवर छापे घातले तेव्हा असे आढळून आले की त्याने अनेक बनावट संस्थांकडून त्याचे बेहिशेबी उत्पन्न असुरक्षित कर्जाकडे वळवले आहे.

परदेशातून निधी गोळा करताना सूदने परदेशी योगदान नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपही विभागाने केला आहे. तसेच आयकर विभागाने ४८ वर्षीय अभिनेत्याच्या लखनौमधील व्यवसाय करण्याच्या जागेवर १५ सप्टेंबर रोजी छापे टाकले होते. यामध्ये सीबीडीटीने म्हटले होते की छापे अजूनही सुरू आहेत. सीबीडीटीने एका निवेदनात म्हटले आहे की, “अभिनेता आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात आता कर चुकवण्याशी संबंधित पुरावे सापडले आहेत.”

हे ही वाचा:

तिने केला स्वतःच्याच केसांनी दोरीउड्या मारण्याचा गिनिज रेकॉर्ड

आयपीएलनंतर विराट सोडणार बेंगळुरूचे कर्णधारपद

चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री

रस्ते दुरुस्ती मुद्द्यावर आता फडणवीसांनी विचारले सवाल

अधिक बोलताना सीबीडीटीने म्हटले की, “अभिनेत्याने अवलंबलेली मुख्य पद्धत म्हणजे तो त्याच्या बेहिशेबी उत्पन्न बोगस संस्थांकडून सुरक्षित कर्जामध्ये रुपांतरित करायचा.” निवेदनात पुढे म्हटले आहे की आतापर्यंत अशा 20 नोंदी पाहण्यात आलेल्या आहेत. दरम्यान तपासादरम्यान त्यांच्या प्रदात्यांनी ‘बनावट’ नोंदी (खात्यातील व्यवहारांच्या नोंदी) प्रदान केल्याचे कबूल केले आहे. कर विभागासाठी धोरण ठरवणाऱ्या संस्थेने म्हटले आहे की, त्यांनी (नोंदी पुरवणाऱ्या) रोख रकमेऐवजी धनादेश जारी करणे स्वीकारले आहे. कर चुकवण्याच्या हेतूने खात्यांच्या पुस्तकांमध्ये कर्ज म्हणून पावत्या लपवल्या गेल्याची उदाहरणे आहेत. ही बोगस कर्जे गुंतवणूक करण्यासाठी आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरली गेली. आतापर्यंत 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची करचुकवेगिरी सापडली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा