भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूसंदर्भात खळबळजनक माहिती समोर आली असून सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग या दोघांवर संशय व्यक्त केला जात आहे. फोगाट यांच्या भावाने आपल्या बहिणीचा मृत्यू संशयास्पद असून तिचा खून झाला असल्याची तक्रार केलेली आहे.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली फोगाट या गोव्याच्या रेस्टॉरन्टमधून सुधीर सांगवान याच्यासह बाहेर जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत. त्यांना चालता येणेही कठीण असल्याचे त्यात दिसते आहे. त्यांच्यासोबत सुखविंदर सिंग हादेखील दिसतो आहे. कर्लीस रेस्टॉरन्टमधून हे तिघेही सोमवारी रात्री आपल्या हॉटेलकडे जात असल्याचे दिसते आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी फोगाट या सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या पण तिथे त्यांना मृत असल्याचे घोषित करण्यात आले.
पोलिसांनी याबाबत सांगितले की, सुधीर सांगवानने सोनाली यांना काहीतरी प्यायला दिले हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसते आहे. त्यानंतर ग्रँड लिओनी या हॉटेलवर ते गेले. सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक निदान झाले होते. पण आता त्यातील वेगळी तथ्ये बाहेर येत आहेत.
#WATCH | Sonali Phogat death: Goa IGP says,"…Video establishes that one of the accused forcefully made her consume a substance. When confronted, accused Sukhwinder Singh & Sudhir Sangwan confessed they intentionally mixed obnoxious chemical into a liquid & made her drink it…" pic.twitter.com/85aPyjuGy4
— ANI (@ANI) August 26, 2022
सोनाली फोगाट यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यात त्यांच्या शरीरावर जखमा असल्याचेही आढळले होते. पोलिसांनी म्हटले आहे की, इतर चाचण्या आणि व्हिसेराची चाचणी केल्यानंतर सगळे स्पष्ट होऊ शकेल. हे प्रकरण सीबीआयकडे देण्यासंदर्भातही विचार करता येईल, असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे. सोनाली फोगाट या हरयाणाच्या भाजपा नेत्या होत्या.
हे ही वाचा:
मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण
बालवाड्यांची माहिती मिळणार एका क्लिकवर
अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन पडले, जे जे रुग्णालयात दाखल
लफडीच लफडी चहूकडे, गं बाई गेला पाटकर कुणीकडे???
सोनाली फोगाट यांच्यावर बलात्कार झाला असल्याचा आरोपही त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे, पण अद्याप पोलिसांना तशी कोणतीही माहिती त्यासंदर्भात मिळालेली नाही.
सोनाली फोगाट यांचे बंधू रिंकू ढाका यांनी म्हटले आहे की, सोनाली फोगाट यांची संपत्ती ताब्यात घेण्यासाठी आणि त्यांचे राजकीय करिअर उद्धवस्त करण्यासाठी त्यांचा काटा काढला गेला.