सोनाली फोगाट प्रकरणात आता सीबीआयची उडी

हरयाणातील खाप पंचायतीने आणि सोनाली यांच्या मुलीने केली होती सीबीआय तपासाची मागणी

सोनाली फोगाट प्रकरणात आता सीबीआयची उडी

हरयाणाच्या भाजपा नेत्या आणि टिक टॉक स्टार सोनाली फोगाट यांची नुकतीच हत्या झाल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले. आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जाणार आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासंदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी निर्णय घेतला आहे.

सोनाली फोगाट यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यासंदर्भात गूढ वाढत चालले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या मार्फत व्हावी अशी मागणी केली जाऊ लागली. खाप पंचायतीने अशी मागणी केली होती. त्यानुसार गोवा सरकारने ही मागणी लक्षात घेत सीबीआयकडे हे प्रकरण सोपविण्याचा निर्णय घेतला. आता यानंतर सोनालीच्या मृत्यूचे नेमके गूढ उलगडणार का, हा प्रश्न शिल्लक आहे.

२३ सप्टेंबरपर्यंत हे प्रकरण सीबीआयकडे सोपवा अशी मागणी आणि मुदत हरयाणातील खाप पंचायतीने गोवा सरकारला दिली होती. सरकारने ही मागणी मान्य केली आहे.

हे ही वाचा:

रुग्णालयांमध्ये बोगस फिजिओथेरेपिस्टचा ‘वावर’

मुंबईतल्या वसतिगृहातून सहा मुली पळाल्या

आशिया कपवर श्रीलंकेने कोरले नाव

प्रभादेवीत ‘त्या’ ठिकाणी सापडली काडतुसाची रिकामी पुंगळी

 

हरयाणाच्या हिसार येथील खाप पंचायतीने बैठक घेऊन ही मागणी केली होती. त्यात सोनाली फोगाट यांची मुलगी यशोधराही सहभागी झाली होती. तिच्या मागणीनंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घेतला. आपले पोलिसही या प्रकरणाची सखोल तपासणी करत आहेत पण सोनाली फोगाट यांच्या मुलीने सीबीआय चौकशीची मागणी केल्यामुळे आम्ही हे प्रकरण त्यांच्याकडे सोपवत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

सोनाली फोगाट यांचा मृत्यू ऑगस्ट महिन्यात गोव्यात झाला. प्रारंभी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात होते पण नंतर समोर आलेल्या काही सीसीटीव्ही फूटेजमधून वेगळेच सत्य बाहेर येऊ लागले. त्यानंतर सोनाली यांचा पीए सांगवानला पकडण्यात आले.

Exit mobile version