हरियाणाच्या भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगटच्या हत्येप्रकरणी गोवा पोलिसांनी रामा मांद्रेकर या पाचव्या आरोपीला अटक केली आहे. मांद्रेकर यांच्यावर पॅडलर दत्तप्रसाद गावकर यांना ड्रग्ज पोहोचवल्याचा आरोप आहे, त्यानंतर गावकरने सुधीर सांगवानला ड्रग्ज विकले.या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुधीर सांगवान याच्या चौकशीदरम्यान पोलिसांना अनेक महत्त्वाची माहिती मिळाली. त्याआधारे कारवाई करत ड्रग्ज पेडलर रामाला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी गोवा पोलिसांनी आतापर्यंत ज्या पाच जणांना अटक केली आहे त्यात गोव्यातील कर्लीज रेस्टॉरंटचा मालक एडविन न्युन्स, ड्रग्ज तस्कर दत्त प्रसाद गावकर आणि रामा मांद्रेकर याशिवाय मुख्य आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांचा समावेश आहे. पोलिसांनी शनिवारी कर्लीज रेस्टॉरंटच्या टॉयलेटरीजमधून सिंथेटिक ड्रग्स जप्त केले होते, त्यानंतर रेस्टॉरंटच्या मालकाला अटक करण्यात आली होती. त्याचवेळी ड्रग पेडलर दत्तप्रसाद गावकर याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.
यापूर्वी सोनालीचा पीए सुधीर सांगवान, मित्र सुखविंदर सिंह, कर्ली क्लबचा मालक, ड्रग्स तस्कर दत्ता प्रसाद यांच्यासह चार आरोपींना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.दत्तप्रसाद गावकर नावाच्या व्यक्तीने फोगटच्या दोन साथीदारांना हे औषध पुरवले होते. या दोघांनी ही औषधे फोगटला दिली होती. शनिवारी अटक करण्यात आलेली आणखी एक व्यक्ती उत्तर गोवा जिल्ह्यातील कर्लीज रेस्टॉरंटचा मालक एडविन न्युन्स आहे. शनिवारी सकाळी अंजुना येथून त्याला ताब्यात घेण्यात आले असं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.
हे ही वाचा:
काँग्रेसचे पदाधिकारी म्हणाले, बरे झाले मविआ सरकार पडले
न्यायमूर्ती उदय लळित यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ
धक्कादायक! कुरापती चीन अरुणाचलजवळ करतोय बांधकाम
नीरजने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय
दोषींना नक्कीच शिक्षा होईल
शनिवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही सोनाली फोगट हत्याकांडप्रकरणी गोवा पोलीस नक्कीच कारवाई करतील, असे सांगितले. प्रमोद सावंत म्हणाले, “पहिल्या दिवसापासून तपासात पूर्ण सहकार्य केले जात आहे आणि त्यात जो कोणी सहभागी असेल, त्यांच्यावर गोवा पोलिस नक्कीच कारवाई करतील आणि आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याचा कसून तपास सुरू आहे.”