४५ वर्षीय मुलाने संपत्तीच्या वादातून ७० वर्षीय आईची हत्या करून नोकरांच्या मदतीने रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना पश्चिम उपनगरातील जुहू येथे बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी मुलाला आणि नोकराला ताब्यात घेतले असून मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रायगडकडे रवाना झाले आहे. सचिन कपूर आणि त्याच्या नोकराला जुहू पोलिसानी अटक केली आहे.
चिन कपूर हा आई बिना कपूर सह जुहू येथील गुलमोहर रोड या ठिकाणी एका उच्छभ्रू सोसायटीत राहण्यास होता.सचिनचा मोठा भाऊ हा परदेशात राहण्यास आहे, घरात नोकर, आई बिना कपूर आणि सचिन हे तिघेच राहण्यास होते. सचिन हा ट्युशन क्लासेस चालवत होता. सचिन आणि आई बिना यांच्यात मागील काही वर्षांपासून संपत्ती वरून वाद होता.
यावादातून मंगळवारी सकाळी आई आणि मुलात कडाक्याचे भांडण झाले, या भांडणातून सचिन याने आईला धक्का दिला असता आई जमिनीवर कोसळली, त्यानंतर त्याने बेसबॉल च्या बॅटने आईच्या डोक्यात प्रहार केला असता त्यात आईचा मृत्यू झाला. त्यानंतर सचिन याने नोकराला विश्वासात घेऊन त्याला पैशांचे आमिष दाखवत आईचा मृतदेह एका बॉक्समध्ये टाकला आणि बॉक्स मोटारीत टाकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निघून गेला. परदेशात असलेला मुलगा हा आईला फोन करीत होता मात्र तिचा फोन लागत नव्हता, भावाचा देखील फोन लागत नसल्यामुळे त्याने इमारतीच्या वॉचमनला फोन करून विचारले असता घराला कुलूप असल्याचे वॉचमनने सांगितले.त्याला संशय येताच त्याने जुहू पोलिसांना फोन करून कळवले असता पोलीस गुलमोहर रोड येथे दाखल झाली.
हे ही वाचा:
मीराबाई चानूचे ‘दोनशे टक्के’ यश
उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरु
नाशिककरांची ८ तारीख ठरली ‘अपघाताची’
पोलिसांनी चौकशी केली असता सचिन हा सकाळी मोटारीत एक बॉक्स टाकून निघून गेला होता अशी माहिती पोलिसांना समजली. जुहू पोलिसांनी सचिनचा शोध घेत असताना बुधवारी सचिन जुहू परिसरात आल्याचे कळताच पोलिसांनी त्याला आणि नोकराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत मृतदेह रायगड जिल्ह्यात एका जंगलात गाडला असल्याची ।माहिती सचिनने पोलिसांना दिली. जुहू पोलिसानी हत्येचा गुन्हा दाखल करून मृतदेहाची विल्हेवाट लावली त्या ठिकाणी पोलिसाचे पथक आरोपीना घेऊन रवाना झाले आहे.