30 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामामोबाईलसाठी एक लाख चोरले, पण वडिलांच्या धाकाने केली आत्महत्या!

मोबाईलसाठी एक लाख चोरले, पण वडिलांच्या धाकाने केली आत्महत्या!

बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी पैसे बाजुला ठेवले होते पण मुलाने त्या पैशांचा गैरवापर केला

Google News Follow

Related

आयफोन खरेदी करण्यासाठी आई-वडिलांना न सांगता घरातून एक लाखाहून अधिक रुपये घेऊन गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने वडिलांना हे कृत्य कळल्यावर आत्महत्या केली. वडिलांनी रागावल्यामुळे आणि शिवीगाळ केल्याने त्याने ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

राजवर्धन यादव हा मुलगा मूळचा उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील आहे. पण शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो मीरा रोड, मुंबई येथे त्याच्या काकांकडे राहत होता. राजवर्धनचे वडील व्यवसायाने शेतकरी असून ते आपल्या दोन मुली आणि पत्नीसोबत उत्तर प्रदेशमध्ये राहतात.

कल्याण रेल्वे रुळाजवळ एक तरुण एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत वाटसरूंना दिसल्याने ही आत्महत्या उघडकीस आली आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. मुलाचे खिसे तपासल्यावर पोलिसांना एक आयफोन आणि इतर कागदपत्रे सापडली ज्याद्वारे त्यांनी राजवर्धनला ओळखले आणि त्याच्या काकांशी संपर्क साधला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ४५% गुणांसह नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला राजवर्धन यूपीमध्ये आपल्या वडिलांना भेटायला गेला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

हे ही वाचा:

‘बिपरजॉय’चा फटका गुजरातला, ३० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

दिल्लीपेक्षा उंच एस्केलेटर आता मुंबईत; टी २ मेट्रो स्टेशनमध्ये होणार

 

“उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावाहून परत येत असताना, राजवर्धनने त्याच्या घरातून १ लाखाहून अधिक रुपये चोरले, जे त्याच्या वडिलांनी मोठ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते आणि त्या पैशातून आयफोन खरेदी केला,” असे महात्मा फुले पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांनी सांगितले. “जेव्हा त्याच्या वडिलांना पैसे गहाळ झाल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी राजवर्धनला फोन केला, त्याला फटकारले आणि यूपीला परत येण्यास सांगितले. राजवर्धन यूपीला जाण्याचा विचार करत होता, परंतु त्याने निर्णय बदलला आणि कठोर पाऊल उचलले.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा