विकृतीची हद्दपार; आयफोन विकत घेण्यासाठी पोटच्या मुलाला विकलं

माता- पित्याला पोलिसांकडून अटक

विकृतीची हद्दपार; आयफोन विकत घेण्यासाठी पोटच्या मुलाला विकलं

पश्चिम बंगालमध्ये एक हादरवणारी घटना घडली आहे. एका जोडप्याने आपलं बाळ विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रील बनवण्यासाठी आयफोन घ्यायला पैसे नसल्यामुळे या माता पित्याने आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पश्चिम बंगालमधील परगणा जिल्ह्यातील पानिहाटी येथील गांधीनगर मध्ये सदर दाम्पत्य आपल्या आई वडिलांसोबत आणि दोन मुलांसोबत राहत होते. त्यांना एक आठ महिन्याचं बाळ आणि एक मुलगी आहे. बाळाचे वडील जयदेव हा मोलमजुरी करून घर चालवतो मात्र, एके दिवशी अचानक त्यांच्याकडे महागडा आयफोन असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. शिवाय त्यांचे बाळ दिसत नसून बाळाची आई रील बनवण्यासाठी विविध ठिकाणी फिरत असल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं. याबाबत शेजाऱ्यांनी विचारणा केली असता त्यांना स्पष्ट उत्तर देता आलं नाही त्यामुळे शेजाऱ्यांचा संशय बळावला.

अखेर वारंवार विचारल्यानंतर पैशासाठी बाळाला विकल्याचे या मातापित्याने कबूल केले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला आणि बाळ विकत घेणाऱ्या महिलेला अटक केली असून आरोपी पिता फरार होता. मात्र, पोलिसांनी त्याच्याही मुसक्या आवळल्या. पोलिसांकडून बाळाची सुटका करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

महिला अत्याचाराविरोधात केंद्र सरकारचे ‘झिरो टॉलरेंस’ धोरण

टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा उद्योगरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी

‘महामृत्युंजय यंत्र लावणे आणि मंत्र म्हणणे ही अंधश्रद्धा आहे काय?

आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये

दरम्यान, आठ महिन्याच्या बाळाची विक्री केल्यानंतर या दाम्पत्याने मुलीचीही विक्री करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. याप्रकरणी अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version