दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे या महिन्याच्या १८ तारखेला दुपारच्या सुमारास, एका व्यक्तीचा कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना घडली. ज्ञानदेव प्रभू नागणसूरे (वय ५५ रा.वडापुर)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर इसमाचा खून करण्यात आला होता. अमोगसिध्द भीमू पुजारी असे खून करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, १९ तारखेला लगेचच मंद्रुप पोलिसांनी अटक केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पुजारी यांनी या आधीही दोन खून केले आहेत. २००९ साली
चारित्र्याचा संशयावरून अमोगसिध्दने पत्नीचा खून केला होता. त्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्याच्या घडीला तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यामुळे सोलापूरात सध्या याच घटनेची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे. सदर आरोपीला पकडण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत.
ज्ञानदेव प्रभू नागणसूरे (वय ५५ रा.वडापुर)असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव होते. त्यांचा मुलगा दत्तात्रय नागणसुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संशयित आरोपी अमोगसिद्ध भीमू पुजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मृत ज्ञानदेव नागणसूरे हे वडापूर-विंचूर रस्त्यावरील आपल्या शेतातील गवत आणण्यासाठी गेले होते. त्यावेळीस त्यांच्यावर हा खुनी हल्ला झाला.
ज्ञानदेव नागणसूरे हे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सायकलवरून गवत घेऊन निघाले होते. त्याचवेळी पाठीमागून अमोगसिद्ध पुजारी यांनी हातातील कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार केले. घटनास्थळी नागणसूरे मरण पावले होते. त्यांच्यावर मानेवर, डोक्यात कोयत्याने वार केले होते. त्यानंतर अमोगसिद्ध हा घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांनी पुढील तपास करत खून झाल्याच्या चोवीस तासात आरोपी पुजारीला बेड्या ठोकल्या आहेत. या तपासात मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, पीएसआय अमितकुमार करपे, अल्लाबक्ष सय्यद तसेच एएसआय लिगेवान, मुलाणी, हवलदार महिंद्रकर, श्रीकांत बुरजे, व्हनमाने, कोळी, काळे व वाघमारे यांच्या पथकाने महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
हे ही वाचा:
मंगळवार पर्यंत आर्यन खान तुरुंगातच
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर; आज होणार चौकशी
‘मन्नत’ च्या दारी एनसीबी अधिकारी
२००९ साली सदर खुनी पुजारी याने आपल्या पत्नीचा खून अनैतिक संबंध असल्याच्या संशायावरून केला होता. पुजारी यांच्या मते त्यांच्या पत्नीचे आणि नागणसुरे यांचे अनैतिक संबंध होते. शिक्षा भोगून जामिनावर आल्यानंतर अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने माझ्या वडिलांचा खून केल्याची फिर्याद मुलगा दत्तात्रय नागणसुरे यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात दिली. पॅरोलवर सुटून आल्यानंतर आरोपी पुजारी हा मी आणखीन दोन खून करणार आहे, असे सर्वांना सांगत फिरत होता.