डोंबिवलीतील पलावा सिटी मध्ये राहणाऱ्या एका ३८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनियरने अटल सेतू वरून समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. करुतुरी श्रीनिवास असे या इंजिनियरचे नाव असून त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नसून कोस्ट गार्डच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.
आर्थिक अडचणीमुळे श्रीनिवास याने आपले जीवन संपवले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे, याप्रकरणी न्हावाशेवा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. श्रीनिवास हा एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामाला होता.त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी न्हावा शेवा पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
हे ही वाचा:
बोरिवलीतील कनाकिया समर्पण टॉवरला आग, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी !
वरळी स्पामध्ये झाली होती खबऱ्याची; स्पा मालकाला अटक, तीन जण गुन्हे शाखेच्या ताब्यात
ऑलिम्पिक २०२४; भारतीय महिला तिरंदाजी संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश !
विहार व मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागले
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आम्हाला कळले की तो टाटा नेक्सॉन कारमध्ये आला होता आणि अटल सेतूवर थांबला होता आणि नंतर समुद्रात उडी मारली होती,”असे न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांना कारमध्ये त्याची ओळखीची कागदपत्रे सापडली, “त्याने कारमध्ये त्याचे आधार कार्ड सोडले, ज्यावरून तो डोंबिवलीतील पलावा सिटीचा रहिवासी असल्याची ओळख पटली. त्यानंतर आम्ही त्यांच्या पत्नीला घटनेची माहिती दिली. कारमध्ये कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही आणि आम्ही सध्या या प्रकरणाचा तपास करत आहोत,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांकडून श्रीनिवास यांच्या पत्नीचा जबाब नोंदविण्यात आला असून श्रीनिवास हे मागील काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आले होते असे पत्नीच्या जबाबावरून समोर येत असल्याची माहिती समोर आली आहे. “कोस्ट गार्ड पोलिस, न्हावा शेवा पोलिस आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.