बिहारमध्ये गेल्या महिन्याच्या अखेरीस अररिया येथील एका शाळेत मध्यान्ह भोजनात साप सापडला होता. हे जेवण जेवल्यामुळे जवळपास १०० मुले आजारी पडली होती. पंतप्रधान मध्यान्ह भोजन योजनेला बदनाम करण्यासाठी हे कृत्य जेवण बनविणाऱ्या आचाऱ्याने केल्याचे समोर आले आहे.
हे जेवण करणारी महिला मेहरुन्निसाचा पती मूर्तजा याने मुलांच्या जेवणात साप टाकल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघांवरही पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलिस आणि प्रशासनाने यासंदर्भात चौकशी केली आणि त्याच्या अहवालात हे कृत्य मूर्तजा नावाच्या इसमाने केल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा:
सादरीकरणावेळी मंचावरचं भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन
धुळ्यात अनधिकृत टिपू सुलतान स्मारक रात्री उशिरा हटविले
डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय
ओमराजेंच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न; अपघात की घातपात?
फारबिसगंजचे एसडीओ सुरेंद्र कुमार अलबेला यांनी सांगितले की, या दोघा आरोपींना आता तिथून काढून टाकण्यात आले आहे. सरकारच्या पंतप्रधान मध्यान्ह योजनेला बदनाम करण्यासाठी हे कृत्य या दोघांनी केले. त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. जोगबनीचे पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगतलाल मंडल यांनी सांगितले की, तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात जो अहवाल आला त्यातून असे समोर आले आहे की, या योजनेला बदनाम करण्याचा आणि कायदा, सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंडविधानातील संबंधित कलमे या दोघांवर लावण्यात आली आहेत. या दोन्ही आरोपींचा सध्या शोध सुरू आहे.
त्या अहवालात म्हटले आहे की, १८ मुलांनी जेवण घेतले होते. १९व्या मुलाला जेवण दिले त्यात साप होता. त्यानंतर अनेक मुलांनी पोटदुखीच्या तक्रारी केल्या त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण त्या सगळ्या मुलांची प्रकृती उत्तम होती.