25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाशूजमधून सोनं लपवून तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

शूजमधून सोनं लपवून तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

Google News Follow

Related

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) एका खाजगी विमान कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने सोन्याच्या तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले असून १.१ कोटी रुपयांचे २ किलो सोने जप्त केले आहे. फेब्रुवारीपासून आतापर्यंत कोटी रुपयांच्या एकूण १८ किलो सोन्याची तस्करी झाल्याचा संशय डीआरआयला आहे. डीआयआरने दशरत सावंत आणि गणेश पाटील या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही एअरलाईनचे कर्मचारी आहेत, तसेच हाऊसकीपिंग विभागाशी संबंधित आणखी दोघांचा शोध घेण्यात येत आहेत.

दुबई-मुंबई फ्लाइटच्या वॉशरूममध्ये तस्करांनी सोन्याचे बार लपवून ठेवल्याची विशिष्ट गुप्त माहिती डीआयआरच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती, डीआयआर अधिकाऱ्यांनी कारवाईवर कडक नजर ठेवली मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. काही तासांनंतर त्यांना विमानतळाबाहेर सोने नेण्यात आल्याची माहिती मिळाली. विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकार्‍यांनी पाटीलला ताब्यात घेतले, त्यांनी हे सोने शूजमध्ये लपवून बाहेर आणल्याची कबुली दिली आणि नंतर ते अंधेरीतील बस स्टॉपजवळील गोदामाच्या मागे सोडले, तेथून सावंत हा पार्सल उचलणार होता, दरम्यान अधिकाऱ्यांनी सापळा रचून सावंत पार्सल घेण्यासाठी आल्यावर त्याला अटक केली. अधिकाऱ्यांनी १.१ कोटी रुपये किमतीच्या १ हजार ६७ ग्रॅम आणि १ हजार ६८ ग्रॅम सोन्याच्या १८ बार जप्त केले.

हे ही वाचा:

संगमनेरमध्ये कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक

शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप

शिवसेना खासदार भावना गवळींना अटक होणार?

महाराष्ट्रात सापडलेल्या तलवारीच्या साठ्यासाठी गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का ?

चौकशीदरम्यान, या दोघांनी सांगितले की ते अरमान, अहमद आणि सय्यद यांच्यासाठी काम करतात आणि त्यांना प्रत्येकी ७ हजार रुपये दिले जायचे. या दोघांनी फेब्रुवारीपासून १० वेळा सोन्याची तस्करी केल्याचे सांगितले आणि एअरलाइनच्या अन्य कर्मचाऱ्याचे नाव उघड केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा