‘अबब! १५ कोटी रुपयांचे ड्रग्स कॅप्सूल पोटात ठेवून तस्करी करणारा मुंबई विमानतळावर अटक’

डीआरआय पथकाची कारवाई

‘अबब! १५ कोटी रुपयांचे ड्रग्स कॅप्सूल पोटात ठेवून तस्करी करणारा मुंबई विमानतळावर अटक’

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १५ कोटी रुपयांच्या कोकेनसह एका आफ्रिकन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने हे कोकेन कॅप्सूलमध्ये भरून त्याचे सेवन केले होते.महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय ) अधिकाऱ्यांनी तरुणाला रोखून त्याची चौकशी केली असता हे प्रकरण उघड झाले.

अटक करण्यात आलेला आरोपी आयव्हरी कोस्टचा रहिवासी आहे.एक आफ्रिकन व्यक्ती मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी करत असल्याची माहिती, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाला मिळाली होती.गुप्त माहितीच्या आधारे पथकाने आफ्रिकन व्यक्तीला पकडले आणि त्याची चौकशी केली.सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.मात्र, कोकेन कॅप्सूलमध्ये भरून त्याचे सेवन केले असून या अमली पदार्थाची तस्करी करत असल्याची कबुली त्याने दिली.

हे ही वाचा:

‘२,९०० पीडित आहेत कुठे?’

रतलाममधील काँग्रेस उमेदवार म्हणतो, दोन बायका असतील तर देऊ दोन!

लाच म्हणून मागितला मोबाईल फोन; महिला पोलीस अधिकारी जाळ्यात

पाकला सन्मान द्या, नाहीतर अणुबॉम्ब फोडतील! मणिशंकर अय्यर यांनी दिला फुलटॉस

त्यानंतर पथकाने आरोपीला न्यायालयात हजर केले.न्यायालयाच्या परवानगीनंतर आरोपीला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.आरोपीच्या पोटात १,४६८ ग्रॅम कोकेनच्या ७७ कॅप्सूल सापडल्या.या सर्व कॅप्सूल बाहेर काढण्यासाठी तब्बल तीन दिवसांचा कालावधी लागला.या अमली पदार्थाची किंमत तब्बल १५ कोटी रुपये असल्याची माहिती डीआरआय पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.दरम्यान, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची चौकशी सुरु आहे.

Exit mobile version