जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी

हल्ल्यात एक लष्करी कॅप्टन आणि इतर तीन जवान हुतात्मा झाले होते

जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात १६ जुलै रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे पोलिसांनी जारी केली आहेत. हे दहशतवादी डोडाच्या वरच्या भागात उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्रत्येक दहशतवाद्याची माहिती देणाऱ्यास ५ लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर केले आहे.

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात १६ जुलै रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात एक लष्करी कॅप्टन आणि इतर तीन जवान हुतात्मा झाले होते. डोडा उरारी बागी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारादरम्यान ही घटना घडली होती. या हल्ल्याची जबाबदारी ‘काश्मीर टायगर्स’ या पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या एका गटाने घेतली होती. या हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी करण्यात आली आहेत. स्थानिकांनाही मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यांची योग्य माहिती देणाऱ्यांना पाच लाखांचे बक्षीसही देण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. यात काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले असून अनेक सुरक्षा कर्मचारीही हुतात्मा झाले आहेत. तर, लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबवली जात आहे.

हे ही वाचा..

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा

चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये येशूची थट्टा; टीकेची झोड, भारतात ठरले असते अभिव्यक्ती स्वातंत्र्य

बंगळूरूमधील वसतिगृहात तरुणीची गळा चिरून हत्या करणाऱ्याच्या मध्य प्रदेशातून आवळल्या मुसक्या

शनिवार, २७ जुलै रोजी कुपवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. यामध्ये एक जवान हुतात्मा झाला असून एका मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले आहेत. जवानांनी एका दहशतवाद्यालाही ठार केले. या भागात अजूनही शोध मोहीम राबवली जात आहे.

Exit mobile version