डोडामध्ये लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध

दहशतवाद्यांनी बुधवारी सायंकाळी शोध मोहीम करणाऱ्या पथकावरही केला गोळीबार

डोडामध्ये लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध

जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांच्या चौकीवर हल्ला केला होता. यानंतर आता जम्मू-काश्मीर पोलिसांनी डोडा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यांमधील चार दहशतवाद्यांचे स्केच जारी केले आहे. याशिवाय दहशतवाद्यांची माहिती दिल्यास २० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणाही पोलिसांकडून करण्यात आली आहे.

मंगळवार, ११ जून रोजी दहशतवाद्यांनी भद्रवाहच्या चतरगल्ला येते चार राष्ट्रीय राइफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर गोळीबार केला होता. यानंतर बुधवारी जिल्ह्यातील गंडोह परिसरातील शोध मोहीम करणाऱ्या दलावर हल्ला केला असता एका पोलीस कर्मचाऱ्यासह सात सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेसा गावातील घनदाट जंगलातील कोटा टॉप भागात संध्याकाळी ७.४० च्या सुमारास चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांनी शोध मोहीम करणाऱ्या पथकावर गोळीबार केला. यामुळे चकमक सुरू झाली आणि चकमकीत कॉन्स्टेबल फरीद अहमद हे जखमी झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अशातच, आता जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी डोडा जिल्ह्यातील दोन हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. तसेच त्यांच्याविषयी खात्रीलायक माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. प्रत्येक दहशतवाद्याची माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या परिचालन तळावर (टीओबी) दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. या चकमकीत भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्तुरात १ दहशतवादी ठार झाला.

हे ही वाचा:

जगन्नाथपुरी मंदिराचे सर्व दरवाजे आज उघडणार

भारत विरुद्ध चित्तथरारक सामन्यात अमेरिककडून चूक; पाच धावांची पेनल्टी

अमेरिकेला पराभूत करून भारताची सुपर आठमध्ये धडक

हिंदू यात्रेकरूंवरील हल्लाप्रकरणी विहिंप, बजरंग दल आक्रमक!

यापूर्वी रविवारी, कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिरापासून शिव खोरी मंदिराकडे जात असताना यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या ५३ आसनी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथून यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस गोळीबारानंतर खोल दरीत कोसळली, त्यात १० जण ठार आणि ४१ जण जखमी झाले. अशातच आता पोलिसांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे. तसेच त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले आहे.

Exit mobile version