कर्नाटकातील चित्रदुर्गात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचे सांगाडे घरात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार,कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका घरात पाच सांगाडे सापडले आहेत.हे सर्व सांगाडे एकाच कुटुंबातील सदस्यांचे असल्याचे सांगितले जात आहे.
वृत्तानुसार, नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, हे कुटुंब पूर्णपणे एकाकी जीवन जगत होते आणि गंभीर आरोग्य समस्यांनी ग्रस्त होत्रे. जुलै २०१९ च्या सुमारास या कुटुंबाला शेवटचे पाहिले गेले होते आणि तेव्हापासून त्यांचे घर बंद होते. सुमारे दोन महिन्यांपूर्वी मॉर्निंग वॉक करताना लाकडापासून बनवलेल्या घराचा मुख्य दरवाजा तुटल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले होते, तरीही स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिलेली न्हवती.
हे ही वाचा:
ठाकरे गट स्वबळावर लोकसभेची एकही सीट निवडून आणू शकत नाही
लल्लन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर जेडीयूच्या अध्यक्षपदी नितीश कुमारांची नियुक्ती!
भारतीयांची फाशी रद्द होणे म्हणजे भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय
जुन्या फायली, खराब झालेली उपकरणे, जुन्या गाड्यांतून बाराशे कोटींची कमाई
घटनास्थळाची पुढील तपासणी केली असता घराच्या आत अनेक प्रकारची तोडफोड झाल्याच्या खुणा समोर आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना एका खोलीत चार सांगाडे (दोन बेडवर आणि दोन जमिनीवर) पडलेले आढळले, तर दुसऱ्या खोलीत आणखी एक सांगाडा सापडला. दरम्यान, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) टीम आणि सीन ऑफ क्राइम ऑफिसर्स (एसओसीओ) यांना देवेंगेरे येथून पाचारण करण्यात आले असून घराभोवती सुरक्षा कडक करण्यात आली.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.