१६४ कोटी रुपये खंडणी मागणाऱ्या ६ जणांना अटक

ईडी करणार स्वतंत्र तपास

१६४ कोटी रुपये खंडणी मागणाऱ्या ६ जणांना अटक

मुंबईतील एका बांधकाम व्यवसायिकाला ईडीची धमकी देऊन १६४ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या ६ जणांना मुंबई गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. या प्रकरणात आता ईडीने गुन्हे शाखेच्या गुन्ह्याच्या आधारावर स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने ३१ जानेवारी रोजी या प्रकरणात अवनिष दुबे (४६), राजेंद्र शिरसाठ (५९),राकेश केडीया (५६),कल्पेश भोसले( ५०),अमेय सावेकर (३८) आणि हिरेन भगत उर्फ रोमि भगत (५०) या ६ जणांना अटक केली आहे.

बोरिवली, दहिसर,मालाड, कांदिवली,खार आणि चेंबुर परिसरात राहणारी ही टोळी रियल इस्टेटच्या व्यवसायात आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ९च्या पथका चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले की, पाच जणांना अटक केल्यानंतर परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला हिरेन रमेश भगत उर्फ ​​रोमी भगत याला गुरुवारी मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली असून त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी यापूर्वीच अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या चौकशीत रोमीचे नाव पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी स्वत:ची ईडी अधिकारी म्हणून ओळख करून देत ओंकार डेव्हलपर्सला बोलावून बैठक घेतल्याचा आरोप आहे. या आरोपींनी रायवाल बिल्डर सतीश धानुका यांच्याशी १६४ कोटी रुपये देऊन समझोता करण्यासाठी दबाव टाकला.

हे ही वाचा:

४० जागा तरी जिंकता येतील का? ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर केला प्रहार

दिवाळखोर पाकिस्तान आता मालदीवला मदत करणार!

खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या मित्राच्या घरावर गोळीबार

मशीद कमिटीची याचिका फेटाळली, ज्ञानवापीत पूजा सुरूच राहणार!

तक्रारदाराने पोलिसांसमोर दावा केला आहे की तो बनावट ईडी अधिकाऱ्यांना घाबरला होता आणि त्याने रोमी भगतला २५ लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. भगत यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांनी त्यांची कोठडी मागितली आणि सांगितले की, आरोपी ऑस्ट्रेलियात नोंदणीकृत असलेले सिमकार्ड आणि खासगी व्हीपीएनचा वापर करून पीडितांशी संवाद साधत होते आणि त्यांना घाबरवत होते.

या प्रकरणात ईडीच्या काही अधिकारी यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणी हे प्रकरण ईडीने या प्रकरणात उडी घेऊन गुन्हे शाखेच्या एफआयआरच्या आधारावर ईडीने या प्रकरणी ईसीआयआर(ECIR) नोंदवून स्वतंत्र तपास सुरू केला आहे.

Exit mobile version