29 C
Mumbai
Tuesday, November 19, 2024
घरक्राईमनामालाच प्रकरणी NHAI च्या अधिकाऱ्यासह सहा जण अटकेत

लाच प्रकरणी NHAI च्या अधिकाऱ्यासह सहा जण अटकेत

२० लाखांची लाच घेतल्याचा आरोप

Google News Follow

Related

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. लाच प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority of India) अधिकाऱ्यांवर आणि खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दोन अधिकारी आणि खाजगी कंपनीच्या दोन संचालकांसह सहा जणांना २० लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

रस्ते प्रकल्पासाठी प्रलंबित बिलांची प्रक्रिया आणि पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जारी करणे तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या बदल्यात लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. दोन्ही आरोपी शासकीय अधिकारी असून ते भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उच्च पदावर कार्यरत आहेत. आरोपींपैकी एक नागपुरातील प्रकल्प संचालक असून त्याचे नाव अरविंद काळे असे आहे. तर, दुसरा आरोपी ब्रिजेश कुमार साहू हा मध्यप्रदेशातील हरदा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा उपमहाव्यवस्थापक आहे. भोपाळ येथील एका खासगी कंपनीचे दोन संचालक आणि दोन कर्मचारी अनिल बन्सल आणि कुणाल बन्सल यांच्यावरही लाच घेतल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्याच्या घरातून सीबीआयने लाचेच्या रकमेसह एकूण सव्वा कोटी रुपये जप्त केले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका खासगी कंपनीला कामाचे कंत्राट दिले होते. खासगी कंपनीने वेळेवर काम पूर्ण करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रकल्प व्यवस्थापक अरविंद काळे यांच्याकडे बिल मंजुरीसाठी सादर केले. प्राधिकरणाने कंपनीचे बिल जमा करून घेतले. कंपनीने उर्वरित काम पूर्ण केले आणि बिलाची रक्कम मंजूर करण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अरविंद काळे यांची भेट घेतली. त्यांनी लवकरच बिल मंजूर करून पैसे खात्यात टाकण्याचे आश्वासन दिले.

मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून बिल मंजूर होत नसल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्याने काळे यांची पुन्हा भेट घेतली आणि बिल मंजूर करण्याबाबत विचारणा केली. अरविंद काळे यांनी प्रकल्पाची रक्कम मिळवून देण्यासाठी कार्यालयातील ११ कनिष्ठ अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल. अन्यथा बील मंजूर करणार नसल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

निवडणुकीत दारुण पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं ईव्हीएमवर बोट!

बहुमतानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ

पश्चिम बंगालमध्ये १६ लाख बनावट मतदार

पदाधिकाऱ्यांना आ

त्यानंतर दोन दिवसांपासून दिल्ली सीबीआयचे पथक नागपुरात सापळा रचून होते. रविवारी संधी मिळताच सीबीआयने काळे यांना पकडले. आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्या कंत्राटदाराला लाभ पोहोचवत असल्याची तक्रार दिल्ली सीबीआयला मिळाली होती. या तक्रारीवरून दिल्ली शाखेचे एक पथक नागपुरात पोहोचले होते. त्यानंतर काळे यांच्या नरेंद्रनगर येथील घराबाहेर सापळा रचला. रविवारी दुपारी भोपाळचा कंत्राटदार काळे यांच्या घरी आला. त्याने काळेंना २० लाख रुपयांची लाच दिली. त्याच दरम्यान सीबीआयच्या पथकाने धाड टाकली. कंत्राटदाराने दिलेले २० लाख रुपये जप्त करून काळे यांच्या घराची झडती घेतली. या झडतीत लाच रकमेसह सोन्याचे काही दागिने आणि महत्त्वाचे कागदपत्रही जप्त करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा