24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामामालवणीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सहा जणांना अटक

मालवणीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सहा जणांना अटक

Google News Follow

Related

मुंबई मधील मालवणी भागात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 3 जून रोजी मालवणी येथे एक सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. सोळा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीवर सात जणांनी मिळून बलात्कार केला. त्यातील सहा जणांना मालवणी पोलिसांनी अटक केली असून एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

गुरुवार, ३ जून रोजी मुंबईतील मलाड जवळच्या मालवणी भागातील सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी आपल्या मित्राच्या घरी त्याच्या वाढदिवसा निमित्त गेली होती. तिथून घरी परतत असताना तिला वाटेत आरोपींनी गाठले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना घडली त्या दिवशी मुलीने आपल्या पालकांना या घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच सांगितले नाही. पण दुसऱ्या दिवशी पोट दुखत असल्याची तक्रार करत आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे तिने आपल्या आई-वडिलांना सांगितले.

हे ही वाचा:

एक कोटी वॅक्सीन टेंडरची सगळी कागदपत्रे जनतेसमोर आणा

ऑक्सिजन एक्सप्रेसने पोहोचवला २५००० मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सिजन

सलग आठव्या महिन्यात जीएसटी महसूल १ लाख कोटींच्या पार

ठाकरे सरकारचा कारभार वरातीमागून घोडे नाचवण्याचा

मुलीने बलात्काराविषयी सांगितलत्यावर तिच्या पालकांनी तडक पोलिस स्टेशन गाठले. या गुन्ह्या विषयी मालवणी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून मुलीच्या जबाबाच्या आधारे एकूण सात आरोपींमधील सहा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर एका आरोपीचा शोध अद्यापही पोलीस घेत आहेत. या सर्व प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर बालक लैंगिक कृत्ये संरक्षण कायदा अर्थात पॉस्को कायद्याच्या अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा