31 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरक्राईमनामाकोल्हापूरमध्ये व्हाट्सऍपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक

कोल्हापूरमध्ये व्हाट्सऍपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक

पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Google News Follow

Related

कोल्हापूर येथे शिवराज्याभिषेक दिनी मोबाईलवर औरंगजेबाचे फोटो स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. देशप्रेमी संघटनांनी आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात बुधवार, ७ जून कोल्हापूर बंदची हाक दिली. तर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात १९ जून पर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी असामाजिक तत्त्वांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये देशप्रेमी संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. तर, गृहमंत्रालयाने कोल्हापुरात शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश दिले आहेत.

औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही, असा आक्रमक इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. जनतेला शांतता पाळण्याचे आवाहन करत त्यांनी कोल्हापूर पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे ही वाचा:

युक्रेनमधील धरण कोसळल्यानंतर ग्रामस्थांचे पलायन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टीमॉडेल विमानतळ असणार

दक्षिण आफ्रिकेतील विशेष कार्यक्रमात ‘आयएनएस त्रिशूल’ सहभागी होणार

अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रात मोदी दुसऱ्यांदा संबोधित करणार

कोल्हापुरात काय घडलं? 

कोल्हापूर जिल्ह्यातील काही विशिष्ट समाजातील तरुणांनी औरंगजेब आणि टिपू सुलतानचे स्टेटस सोशल मिडीयावर ठेवले होते. यावरून हिंदुत्ववादी संघटनेचे काही कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या समोर जमा झाले. तसेच आरोपींना अटक करण्याची मागणी करू लागले. दरम्यान याचवेळी एका गटाने एका विशिष्ट समाजाच्या वस्तीवर दगडफेक केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती. याला हिंसक वळण मिळाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा