24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाहाथरस एसआयटी अहवालानंतर सहा अधिकारी निलंबित

हाथरस एसआयटी अहवालानंतर सहा अधिकारी निलंबित

सत्संगमधील चेंगराचेंगरीत १२१ जणांचा झाला होता मृत्यू

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली होती. यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. एसयाटीच्या पथकाने तीन दिवस तपास केला असून तब्बल १२० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली. यानंतर एसआयटीने ३०० पानांचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात दुर्घटनेची कारणं आणि दुर्घटनेला जबाबदार असलेल्या लोकांची नावं नमूद करण्यात आली आहेत.

हाथरस प्रकरणाचा अहवाल हाती पडताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसह सहा अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. सर्कल ऑफिसरसह, सिकंदरामाऊच्या तहसीलदारांचाही या निलंबित अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. या अहवालात म्हटलं आहे की, सत्संगचे आयोजन करणाऱ्या समितीच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. या अहवालातून एसआयटीने प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. सत्संगाला २ लाखांहून अधिक लोक जमले होते. परंतु, आयोजकांनी केवळ ८०,००० लोकांसाठी परवानगी मागितली होती. दरम्यान, या ३०० पानी अहवालात भोले बाबांच्या नावाचा उल्लेख नसल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

मंत्रालयात जेष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न !

म्हणे “धर्मनिरपेक्षतेसाठीच अल्पसंख्यांकांना राजकीय आरक्षण !”

वसंत मोरेंची आता नवी पसंत..उबाठा गटात प्रवेश !

दाम्पत्याच्या आत्महत्येचे अखिलेश यादव यांनी केले राजकारण

नारायण साकार उर्फ भोले बाबा यांचे २ जुलै रोजी सत्संगमध्ये प्रवचन होते. प्रवचन संपवून बाबा निघून जात असताना सत्संगाला आलेल्या भक्तांनी कारच्या दिशेने धाव घेतली. हजारो लोक एकाच वेळी त्याच्या कारच्या दिशेने धावू लागले आणि त्याच वेळी धक्काबुक्की आणि चेंगरांचेंगरी झाली. यात १२१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा