गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरसह सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू

सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांच्या शोधासाठी परिसरात सर्च ऑपरेशन

गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरसह सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू

रविवारी संध्याकाळी जम्मू- काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागात एका बांधकाम साइटवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक डॉक्टर आणि सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा हल्ला एका बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याजवळ झाला. सध्या सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात काउंटर ऑपरेशन सुरू केले आहे.

अहवालानुसार, डॉक्टर आणि कामगारांवर हल्ला करण्यात आलेले हे कामगार मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील गगनीरला सोनमर्गशी जोडणाऱ्या झेड-मोर बोगद्यावर काम करणाऱ्या बांधकाम टीमचा भाग होते. गांदरबलमधील बोगद्याच्या प्रकल्पावर काम करणारे मजूर आणि इतर कर्मचारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या छावणीत परतले असताना अज्ञात दोन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

हे ही वाचा : 

नवी मुंबई विमानतळाच्या परिसरातील टेकडीवर उभा राहिला ‘अनधिकृत भव्य दर्गा’

भागलपूरच्या प्रसिद्ध शिवशक्ती मंदिरात तोडफोड, हिंदू समाजाकडून निदर्शने!

मुंबई विमानतळावर २ किलो सोने जप्त!

सोमवारी पिंपरीत होणार ब्राह्मण सामर्थ्य संमेलन

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी झालेल्या निःशस्त्र निष्पाप लोकांवर हल्ल्याचा तीव्र निषेध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याचा निषेध करत हे भ्याड कृत्य म्हटले आहे. या घृणास्पद कृत्यामध्ये सामील असलेल्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

Exit mobile version