रशियामध्ये एका शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रशियातील इझेव्हस्क येथील एका शाळेत गोळीबार झाला असून सहा जण ठार झाले आहेत तर २० जण जखमी झाले आहेत. तर हल्लेखोराने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
रशियाची अधिकृत वृत्तसंस्था ‘टास’ने (TASS) याबाबतचे वृत्त दिले आहे. या गोळीबारात सहा जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. रशियाच्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत एका अज्ञात बंदूकधाऱ्याने गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच विद्यार्थी आणि काही शिक्षक एका वर्गात लपून बसले होते. या दुर्घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
हा आहे गुलाम नबी आझाद यांचा नवा पक्ष
नवरात्र २०२२ : महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्र्यांची विशेष भेट
भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात ‘ऑपरेशन मेघदूत’
बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी
घटनेनंतर पोलिसांकडून संबंधित शाळा रिकामी करण्यात आली आहे. तर आजूबाजूच्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. हल्लेखोराने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शाळेमध्ये सुरक्षा आणि मदत बचाव पथके पोहोचली आहेत. तर पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.