27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामामुंबईतल्या वसतिगृहातून सहा मुली पळाल्या

मुंबईतल्या वसतिगृहातून सहा मुली पळाल्या

मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातून मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Google News Follow

Related

मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातून मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवार, ११ सप्टेंबर रोजी पहाटे ही घटना घडली. वसतिगृहातून सहा मुली पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

वसतिगृहाच्या स्वच्छतागृहाची खिडकी आणि ग्रील तोडून या सहा मुली काल सकाळी पळाल्या. पहाटे पाचच्या सुमारास सर्वजण झोपलेले असताना ही घटना घडली. तसेच या मुलींनी पळून जाण्यापूर्वी गार्ड कॉन्स्टेबलच्या खोलीचे गेट बाहेरुन बंद केले होते. जेणेकरून त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी या मुलींचा पाठलाग केला असता आणि त्यांना परत आणले असते.

त्यानंतर सहा मुली पळून गेल्याची माहिती वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना समजली तेव्हा त्यांनी या घटनेचा तपास लावण्याचा प्रयत्न केला. वसतिगृहातील रेकॉर्डनुसार कोणत्या सहा मुली पळाल्या हे समजले असून याची माहिती अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. मुली का पळून गेल्या याचे स्पष्ट कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हे ही वाचा:

ज्ञानवापी मशिदीच्या खटल्यावर आज सुनावणी, वाराणसीत १४४ लागू

“शरद पवार म्हणजे साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह”

पंतप्रधान मोदींच्या या १२०० वस्तूंचा होणार लिलाव

राडा करणाऱ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांची शाबासकीची थाप

गोवंडी पोलिसांकडून याबाबत तपास सुरु असून, संबंधित मुलींचा शोध सुरु आहे. विविध तपास यंत्रणांकडून मानवी तस्करी, भिकारी अशा बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते आणि तेथे सापडलेल्या अल्पवयीन मुलींची सुटका करुन त्यांना गोवंडीच्या वसतिगृहात ठेवले जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा