भ्रष्टाचार आणि पोलिसांच्या बदल्या तसेच नियुक्त्यांच्या आरोपानंतर गृहमंत्रीपदाची खुर्ची गमावणारे अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयची पकड आता अधिक घट्ट होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या मुलांच्या अर्धा डझन कंपन्यांवर सीबीआयची नजर आहे. त्यात कोलकातास्थित कंपनीचाही समावेश आहे. कोलकातास्थित या कंपनीच्या माध्यमातून अनेक कथित बनावट कंपन्यांचे उद्योग सुरू असल्याचे सीबीआयला आढळले आहे.
हे ही वाचा:
देशमुखांविरुद्धच्या गुन्ह्यातील काही भाग वगळा!
भावी महिला पोलीसाला सोनसाखळी चोराचा हिसका
ममतांमुळे रवींद्रनाथांच्या ‘शांतिनिकेतनात’ अशांती
मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले
सीबीआयने देशमुखांविरुद्ध केलेल्या एफआयआरनंतर त्यांची मुले सलील आणि हृषिकेश देशमुख यांच्या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार तपासले. त्यात कोलकाता येथील झोडीयॅक डीलकॉम प्रा. लि. या कंपनीचा समावेश आहे. ही कंपनी कोलकात्यातील लाल बाझार येथे असून ही जुन्या काळातील इमारत आहे तिथे ४०० बनावट कंपन्या काम करत असल्याचे सिद्ध झाले. २०१७मध्ये केंद्र सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सने अशा बनावट कंपन्या आणि काळ्या पैशाविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत ही माहिती उघड झाली होती. यातील अनेक कंपन्या नंतर बंद केल्या गेल्या असल्या तरी अद्याप १०० कंपन्या कोलकात्यातील त्याच पत्त्यावर सुरू आहेत. मार्च २०१९मध्ये झोडियॅकच्या अंतर्गत आयती जेम्स, कॉन्क्रिट रिअल इस्टेट, अटलांटिक विस्टा रिअल इस्टेट्स, कॉन्क्रिट एन्टरप्रायझेस या कंपन्यांचे कामकाज देशमुख यांची मुले आणि इतर कुटुंबीय पाहात होते, असे काही कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. अनिल देशमुख यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात या कंपन्यांबाबत माहिती मिळाल्याचे समजते.