नवी मुंबईतून अचानक लहान मुले बेपत्ता होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुले अचानक गायब होत असल्याने पालकही हादरून गेले आहेत. शिवाय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले अपहरण होत असल्याची पालकांची तक्रार असून यामुळे पोलीसही अलर्ट मोडवर आले आहेत. नवी मुंबईमधून मागील ४८ तासांत सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत.
नवी मुंबईमधून अचानक काही लहान मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. आतापर्यंत सहा मुले गायब झाल्याची तक्रार आहे. गायब झालेली ही सहाही मुले १२ ते १५ वयोगटाची आहेत. बेपत्ता मुलांचे अपहरण झाल्याची तक्रार या पालकांनी केली आहे. पोलीस ठाण्यात तशी तक्रारही नोंदविण्यात आली आहे. नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, कोपरखैरणे, रबाळे, कळंबोली आदी परिसरातून ही मुले गायब झाली आहेत.
ही सर्व मुले ३ आणि ४ डिसेंबर रोजी बेपत्ता झाली आहेत. या सहा मुलांपैकी एक मुलगा कौपरखैरणेमधून गायब झाला होता. दुसरा १२ वर्षांचा एक मुलगाही असाच बेपत्ता झाला होता. नंतर तो ठाणे रेल्वे स्टेशनवर सापडला. गायब झालेल्या मुलांपैकी काही मुलं शाळेत गेल्यावर गायब झाली. कुणी मित्राच्या घरी कार्यक्रमाला तर कुणी वाढदिवसाला गेलेले असताना गायब झाली आहेत. रबाळेतील एक मुलगा तर सार्वजनिक शौचालयात गेला होता. तिथून तो गायब झाला आहे. मुलं अशी अचानक गायब झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेच्या मृत्यूनंतर त्याचा साथीदार परमजीत सिंग उर्फ धाडीला अटक!
ठाकरेंचा विरोध की अदाणी परत या…ची हाळी
उद्धव ठाकरे आणखी किती रडारड करणार?
‘सीआयडी’ अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन!
यापूर्वी टिटवाळ्यातील बनेली गावातूनही २५ ऑगस्ट रोजी तीन मुलांचे अपहरण झाल्याची चर्चा होती. ही तिन्ही मुले खेळण्यासाठी घराच्या बाहेर पडली होती. त्यावेळी त्यांचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.