उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीत लव्ह जिहाद? दोन मुलींना बलात्कार करून ठार मारले

पोलिसांनी सहा आरोपींना पकडले

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीत लव्ह जिहाद? दोन मुलींना बलात्कार करून ठार मारले

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी याठिकाणी दोन दलित मुलींची अत्यंत निर्घृणपणे बलात्कार करून हत्या केल्याचे प्रकरण समोर आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी सहाजणांना अटक केली असून त्यात जुनैद, सोहेल, आरिफ, हाफिज, करिमुद्दीन आणि छोटू (गौतम) यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोपही आता होऊ लागला आहे. त्यासंदर्भातही पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस गेलेले असताना त्यांनी एक आरोपी जुनैद पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्या पायावर गोळी झाडली.

बुधवारी ही भयंकर घटना घडली. त्यात सोहेल आणि जुनैद यांनी या दोन दलित मुलींना ज्यांची वये १५ आणि १७ होती, त्यांना उसाच्या शेतात खेचून नेले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. जेव्हा त्या मुलींनी त्या मुलांना लग्न करण्यासाठी गळ घातली तेव्हा त्या दोघांनी या मुलींची हत्या केली आणि त्यांना त्यांच्या दुपट्ट्याच्या सहाय्याने झाडाला लटकावून बनाव रचण्याचा प्रयत्न केला.

यासंदर्भात पोलिस अधिकारी संजीव सुमन यांनी सांगितले की, या दोन मुली आणि हे आरोपी मित्र होते. छोटूने या मुलींची ओळख या आरोपींशी करून दिली. या आरोपींनी या मुलींशी मैत्री केली आणि नंतर त्यांना शेतात नेले. तिथे सोहेल आणि जुनैद यांनी या मुलींवर बलात्कार केला. त्यानंतर त्यांची हत्या केली.

हे ही वाचा:

जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला

वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात, वेदांताच्या अध्यक्षांची घोषणा

सर विश्वेश्वरय्यांनी अचानक रेल्वेची साखळी खेचली आणि सगळ्यांनाच धक्का बसला

वसईत दोन मातांनी एकाच दिवशी केले ‘अवयवदान’

 

तीन आरोपींनी या दोघींची हत्या केल्यानंतर त्यांनी करिमुद्दीन आणि आरिफ या आणखी दोघांना बोलावून घेतले आणि त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी या मुलींना झाडाला टांगले. यासंदर्भातील अधिक तपास सुरू आहे.

हे पाच आरोपी लालपूर गावातील असून छोटू हा या दोन मुलींच्या शेजारी राहतो. या आरोपींवर ३०२, ३७६ आणि पॉक्सो अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत.

Exit mobile version