मणिपूरमध्ये पसरलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ६० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत. राज्यात हिंसाचाराचे लोण कमी होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जीवन हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.
या जिल्ह्यांमध्ये इम्फाळ पश्चिम, बिष्णुपूर, चुराचंदपूर आणि जिरीबामचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी सकाळी ५ वाजल्यापासून असलेली संचारबंदी सहा तासांसाठी शिथिल करण्यात आली आहे. मंगळवारी या भागात चार तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती.
मैतेई समुदायाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी ३ मे रोजी आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यांच्यावेळी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यानंतर त्याचे लोण राज्यात पसरले. या हिंसाचारात ६० लोकांचा मृत्यू झाला असून २३१ लोक जखमी झाले तर १,७०० घरे जाळण्यात आली . इतर हजारो लोक विस्थापित झाले.या हिंसाचारात ६० लोकांचा मृत्यू झाला असून २३१ लोक जखमी झाले तर १,७०० घरे जाळण्यात आली आहेत.
हे ही वाचा:
‘गो फर्स्ट’च्या ५५ विमानांकडे एअर इंडिया, इंडिगोचे लक्ष
भारतातील ४२,००० कुशल कामगारांना इस्त्रायलमध्ये नोकरीच्या संधी
आता परदेशातील प्रेक्षकही बघणार ‘द केरला स्टोरी’
पैनगंगा नदीच्या पुलावरून ट्रॅव्हल्स कोसळून भीषण अपघात
हिंसाग्रस्त भागातून ४,००० लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना सुरक्षित छावण्यांमध्ये नेण्यात आले आहे. येथे लोकांना नियमित आरोग्य उपचार दिले जात आहेत. २६,००० लोकांना इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे आणि त्यापैकी बहुतेकांनी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला असल्याचे माहिती आणि जनसंपर्क मंत्री सपम रंजन सिंह यांनी सांगितले.