अन्य धर्मीयांचा त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश गंभीर, एसआयटी नेमणार

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश

अन्य धर्मीयांचा त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश गंभीर, एसआयटी नेमणार

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला होता. दुसऱ्या धर्माच्या एका गटाकडून त्र्यंबकेश्वर शहरात यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मंदिर परिसरात थांबवून देवाला धुप दाखवू द्या, असा आग्रह त्या गटाने धरला होता. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदुधर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. त्यामुळे पुरोहितांनी त्यांना विरोध केला. या घटनेची दाखल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देखील दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती, अशी माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘मशिदीत पुरलेल्या कृष्णाच्या मूर्ती खोदून काढा’

‘जीना यहाँ, मरना वहाँ’ म्हणत न्यायाधीशांनी दिला निरोप

उत्तराखंडमध्ये ३०० हून अधिक बेकायदा मझार जमीनदोस्त

कर्नाटक काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाची शर्यत पोटदुखीने सुरू

नेमकं प्रकरण काय?

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातून १३ मे रोजी रात्री नऊ वाजता दुसऱ्या धर्माच्या एका गटाची मिरवणूक होती. मंदिरात जाऊन देवाला धुप दाखवू द्या, अशी मागणी त्या गटातील काहींनी केली. मात्र, मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी त्याला विरोध केला. यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकाराला ब्राह्मण महासंघासह अन्य हिंदु संघटनांनी विरोध दर्शवला. या बाबत त्र्यंबकेश्वर पोलिसांकडे लेखी तक्रार देण्यात आली.

Exit mobile version