सरपंच देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन

समितीत १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. तर देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. अशातच, राज्य शासनाकडून संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने एसआयटीची समिती स्थापन केली आहे. या समितीत १० पोलीस अधिकारी आहेत. आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. बसवराज तेली सीआयडीमधील आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत. एसआयटीमध्ये सर्वच अधिकारी बीड जिल्ह्यातले आहेत. सध्याचे तपास अधिकारी डीवायएसपी अनिल गुजर हेही तपास पथकात असणार आहेत. बसवराज तेली यांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार सदर विशेष तपास पथकामध्ये खालील काही अधिकारी आणि अंमलदार यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासला वेग येणार आहे.

हे ही वाचा : 

अमेरिकेत नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत ट्रक घुसवून गोळीबार

७५ वर्षांनंतर पहिल्यांदा ‘या’ गावातील गावकरी अनुभवणार बस सेवा!

मातोश्रीवर संजय राऊत यांना बुकलले? सोशल मीडियावर गरमागरम चर्चा

संरक्षण मंत्रालयाकडून २०२५ हे ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून घोषित

वाल्मिक कराड याला केज कोर्टाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस आणि सीआयडीचे पथक घेत आहेत. वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर आता तो लवकर सापडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version