28 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरक्राईमनामाबदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Google News Follow

Related

बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरसह राज्यात संतप्त लाट उसळली आहे. या घृणास्पद घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. सध्या पालकांकडून आणि नागरिकांकडून शाळेसमोर, बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन सुरू आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता महायुती सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयाने या संदर्भात माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने केलेल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांनासुद्धा दिले आहेत.”

या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे. तसेच आपण पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याचे त्यांनी म्हटले आहे आणि या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहीजे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. तसेच संबंधित संस्था चालकांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संस्थाचालकांनी कर्मचाऱ्याला कामाला ठेवण्याआधी त्याची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच नियमावली जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा..

संतप्त बदलापूरकरांकडून शाळेची तोडफोड; रेल्वे स्थानकात पोलिसांवर केली दगडफेक

कासीम पठाणच्या छळास कंटाळून तरुणीची आत्महत्या

कोलकाता पीडितेचा मृतदेह पालकांकडे देण्यास वेळ का लागला?

पोर्शे कार अपघात; रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दोघांना अटक

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त पालकांनी मंगळवारी सकाळपासून बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले. यादरम्यान, आंदोलकांकडून शाळेची तोडफोडही करण्यात आली आहे. तर रेल्वे स्थानकावर असलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा