चेंबूर येथे झालेल्या तीन दिवसीय महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. त्याच दरम्यान त्याला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
स्थानिक आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचवेळी कार्यक्रम संपल्यावर सोनू निगमच्या मॅनेजरशी फातर्फेकर यांच्या मुलाने गैरवर्तन केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर सोनू निगमच्या अंगरक्षकालाही त्याने धक्काबुक्की करत खाली पाडले. सोनूलाही धक्काबुक्की झाली. या हाणामारीत सोनू निगम यांच्या गुरुचा पुत्र रब्बानीलाही स्टेजवरून खाली पाडण्यात आले, त्यात त्याला गंभीर दुखापत झाली.
हे ही वाचा:
व्हीपवरून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा
पगारी चाणक्य, नाक कापलेला राजा…
शिवसेनाभवन ही विश्वस्त संस्था असेल तर मग राजकीय कार्यालय कसे?
बागेश्वर धाममध्ये इतकी लोक आले पुन्हा हिंदू धर्मात
यासंदर्भात सोनू निगमने चेंबूर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. आता यासंदर्भात पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. धक्काबुक्की करणाऱ्यांची ओळख पटविण्यात आली आहे.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची एक्स रे चाचणीही करण्यात आली आहे. डॉक्टर सध्या जखमींवर उपचार करत आहेत. सोनूचा मित्र रब्बानी खान हा उस्ताद गुलाम मुस्तफा यांचे पुत्र आहेत.