वाशी चेकनाका परिसरातून ८० कोटींची चांदी जप्त

पोलिसांनी केली कारवाई

वाशी चेकनाका परिसरातून ८० कोटींची चांदी जप्त

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. दरम्यान, राज्यात आचारसंहिता लागली असून या काळात पैशांचे गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासन आणि निवडणूक आयोग सज्ज आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून जागोजागी नाका बंदी करण्यात आली असून चौक्या उभ्या केल्या आहेत. संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत असून कारवाई केली जात आहे.

कारवाई दरम्यान, राज्यभरातून अनेक ठिकाणहून रोख रक्कम, सोने, चांदी आणि दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. अशातच आता मतदानाच्या चार दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे. एका ट्रकमधून ८,४७६ किलो चांदी नेली जात होती. या वाहनावर कारवाई करून चांदी जप्त करण्यात आली आहे. या चांदीची किंमत तब्बल ८० कोटी रुपये आहे. ही चांदी जप्त करण्यात आली असून यासंबंधी चौकशी सुरू आहे.

मानखुर्द पोलीस वाशी चेकनाक्यावर वाहनांची तपासणी करत असून नाकाबंदी करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान शुक्रवारी रात्री एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली आहे. या मोठ्या ट्रकमध्ये पोलिसांना चांदी आढळून आली. या चांदीचे वजन करण्यात आले असता ते ८,५७६ किलो इतके असल्याचे समोर आले. या चांदीची बाजारातील किंमत ८० कोटी रुपये आहे.

हे ही वाचा : 

अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या वडिलांना २५ लाखांचा गंडा; पाच जणांविरोधात तक्रार दाखल

सरसंघचालक मोहन भागवत, इस्रो प्रमुख सोमनाथ यांच्याकडून ‘सनातन’चे कौतुक!

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवी पाकिस्तानातला ‘व्हीआयपी’

व्होट जिहादसाठी आवाहन करणाऱ्या सज्जाद नोमानी यांच्याविरोधात तक्रार

ट्रकमध्ये असलेली चांदी अधिकाऱ्यांनी जप्त केली असून ट्रक चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या पथकाला संपर्क करून तातडीने घटनास्थळी बोलवले. आता आयकर विभागाचे अधिकारी या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. सुरुवातीच्या चौकशीत ही चांदी बेकायदेशीरपणे घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीत तिचा वापर होणार होता का? त्याची चौकशी निवडणूक आयोगाचे पथक करत आहेत.

Exit mobile version