बोनी कपूरची चांदीची भांडी जप्त, किंमत ३९ लाख

बोनी कपूरची चांदीची भांडी जप्त, किंमत ३९ लाख

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. बोनी कपूर यांच्या कथित मालकीची असलेली ३९ लाखांची चांदीची भांडी जप्त करण्यात आली आहेत. कर्नाटकात सध्या निवडणुकीचा माहोल रंगत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही भांडी जप्त केल्यामुळे त्याची वेगळी चर्चा सुरू झाली आहे.

कर्नाटकच्या दावनगेरे येथे शुक्रवारी पहाटे ही भांडी जप्त करण्यात आली. ती ६६ किलो चांदीची भांडी असून त्यांची किंमत ३९ लाख इतकी आहे.

मिस्टर इंडिया या प्रसिद्ध चित्रपटाचे  दिग्दर्शक आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अनिल कपूरचे बंधू बोनी कपूर यांच्या मालकीची ती भांडी असल्याचे बोलले जात आहे. दावनगेरे येथे हेब्बाळू टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. कोणत्याही योग्य कागदपत्रांशिवाय या वस्तू नेण्यात येत होत्या, असा आरोप ठेवण्यात आला आहे. ही चांदीची भांडी चेन्नई ते मुंबई अशी एका बीएमडब्ल्यू कारमधून नेण्यात येत होती. पाच खोक्यांमध्ये ही चांदीची भांडी ठेवण्यात आली होती.

हे ही वाचा:

भारत-श्रीलंका तस्करी प्रकरणी चेन्नईत एनआयएची छापेमारी,सोने , ८०लाखांची रोकड जप्त

आयपीएल मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून अनिल जयसिंघानीला अटक

दिल्लीवरून डेहराडूनला जा फक्त २ तासांत

“राहुलला शिक्षा ठोठावणाऱ्या जजची जीभ कापू”

निवडणूक आयोगाने जी भांडी जप्त केली आहेत त्यात बाऊल, चमचे, मग, बशा यांचा समावेश आहे. दावनगेरे येथे यासंदर्भात ग्रामिण पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. हरी सिंग व चालक सुलतान खान यांच्याविरोधात या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

चौकशीतून ही गोष्ट स्पष्ट झाली की, ही कार बोनी कपूर यांच्या नावावर नोंदणी केलेली आहे आणि बेव्ह्यू प्रोजेक्ट्स प्रा. लि. कंपनीशी संबंधित आहे. जी कंपनी बोनी कपूरची आहे. यासंदर्भात ज्या हरीसिंगविरोधात तक्रार करण्यात आली आहे, त्याने ही सगळी चांदीची भांडी बोनी कपूर यांची असल्याची कबुली दिली. योग्य कागदपत्रे सादर न केल्यामुळे ही भांडी जप्त करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Exit mobile version