25 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरक्राईमनामामुसेवाला हत्येचा कट रचणारा सचिन थापन पोलिसांच्या ताब्यात ! लवकरच भारतात आणणार

मुसेवाला हत्येचा कट रचणारा सचिन थापन पोलिसांच्या ताब्यात ! लवकरच भारतात आणणार

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार होता सचिन थापन बिश्नोई

Google News Follow

Related

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला भारतात आणण्यात आलं आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात सामील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा व्यक्ती सचिन थापन बिश्नोई याला भारतात आणण्यात आलं आहे. सचिनला अझरबैजान येथे अटक करण्यात आली होती, त्यानंतर आता त्याला भारतात आणण्यात आलं आहे.

 

सचिन थापनने दुबईमध्ये बसून सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. शुभदीप सिंग सिद्धू, ज्याला सिद्धू मुसेवाला म्हणून ओळखले जाते.याची २९ मे २०२२ रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा व्यक्ती म्हणू ओळखला जाणारा सचिन थापन बिश्नोई याच्यावर मुसेवालाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता.पंजाब पोलिसांनी कारवाई करत आरोपी सचिन थापन बिश्नोई याला अझरबैजानमधून ताब्यात घेण्यात आलं.

 

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम करतायत

पंतप्रधान मोदींच्या पाठीवर शरद पवारांकडून कौतुकाची थाप; विरोधकांना धडकी

काँग्रेसचे विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन; आयर्लंड विरुद्ध भारत टी- २० मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती

पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचण्यामध्ये सचिन थापन याचा हात होता. हत्येचा कट रचण्यासाठी सचिन गोल्डी ब्रारशी सतत फोनवर संपर्कात होता आणि दोघांचं अनेक वेळा संभाषण झालं. भारत सरकारच्या पाठिंब्याने सचिन थापनला अझरबैजानमध्ये पकडण्यात आलं त्यानंतर आता त्याला भारतात आणण्यात आलं. सिद्धू मुसेवालाच्या हत्येपूर्वीच आरोपी सचिन थापन बनावट पासपोर्टवर भारत सोडून पळून गेला होता.

 

सचिन थापन हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे.सचिन थापन गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचा खास सहकारी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस गोल्डी ब्रारचाही शोध घेत आहेत. सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या गोल्डी ब्रारविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा आणखी एक सहकारी विक्रम ब्रारच्या नावाचाही समावेश होता.याला सुद्धा 26 जुलै रोजी यूएईमधून भारतात आणल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली होती. सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे आहे. याप्रकरणी एनआयएने आतापर्यंत १६ जणांना अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा