यूपीच्या श्रावस्तीमध्ये पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे, जी बनावट नोटा छापून ग्रामीण भागातील बाजारपेठेत चालवत होती. मुबारक अली उर्फ नूरी हा या टोळीचा म्होरक्या असून तो मदरसा चालवतो. त्याने यूट्यूबवरून नोटा छापण्याची पद्धत शिकून घेतली आणि मग त्याच्या मदरशात नोटा छापायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, मुबारक अलीला एकूण पाच बायका आहेत आणि या रॅकेटमध्ये त्यांचाही सहभाग आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मल्हीपूर परिसरात बनावट नोटा छापल्याच्या तक्रारी पोलिसांना येत होत्या. बुधवारी (१ जानेवारी) तपासात गुंतलेल्या पोलिसांनी धर्मराज शुक्ला, रामसेवक आणि अवधेश पांडे यांना बनावट नोटा आणि पिस्तुलासह पकडले. त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गंगापूर येथील फैजुरनबी मदरसा गाठला जिथे बनावट नोटा छापण्यासाठी संपूर्ण सेटअप होता. पोलिसांनी मदरशातून दोन प्रिंटर, दोन लॅपटॉप, शाईच्या चार बाटल्या, ३५,४०० रुपयांच्या बनावट नोटा आणि १४,५०० रुपयांच्या खऱ्या नोटा, ३१५ बोअरचे पिस्तूल आणि पाच मोबाइल फोन जप्त केले आहेत.
हे ही वाचा :
ठाण्यात तीन बांगलादेशी महिलांना अटक!
बांगलादेश न्यायालयाने हिंदू साधू चिन्मय दास यांचा जामीन अर्ज फेटाळला!
क्रीडा विभागात २१ कोटींचा घोटाळा करणारा मुख्य आरोपी गजाआड!
एसपी घनश्याम चौरसिया यांनी सांगितले की, पोलिसांनी मुबारक अलीला अटक केली आहे. त्याच्या पाच बायका असून त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि बनावट नोटांचा धंदा चालवण्यात मदत करत होत्या. हे लोक स्थानिक बाजारपेठेत बनावट नोटा पोहोचवण्यात मदत करायचे. जमील अहमद नावाच्या आणखी एका व्यक्तीलाही मदरशातून अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी मूळ नोटा छापायचे आणि स्कॅनरच्या मदतीने बनावट नोटा तयार करायचे. त्यानंतर ते ग्रामीण बाजारपेठेत खर्च करायचे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.