श्रद्धाच शीर मैदान गढीतील तलावात, आरोपीची कबुली

या प्रकारामुळे आफताब मानसिक रुग्ण असल्याची पोलिसांना शंका आहे.

श्रद्धाच शीर मैदान गढीतील तलावात, आरोपीची कबुली

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येतं आहे. आज, २१ नोव्हेंबर रोजी या प्रकरणामधील आरोपी आफताब पूनावालाची नार्को चाचणी केली जाणार आहे. आरोपीने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करून जंगलाच्या विविध भागात फेकले. पोलिसांकडून श्रद्धाच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याचे काम केले जातं आहे. श्रद्धाचे शिर मैदान गढी येथील तलावात टाकल्याची कबुली आफताबने दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत श्रद्धाच्या शरीराचे १७ तुकडे गोळा केले आहेत. हे सर्व तुकडे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी तपासात महरौली जंगल परिसरात एक शिर आणि एका शरिराच्या जबड्याचा अवयव ताब्यात घेतला. पुढील खुलासा करण्यासाठी सध्या फॉरेन्सिक पथकाकडून पुढील तपास केला जातं आहे. मात्र, आफताबने श्रद्धाचं शीर छत्तरपूर येथील मैदान गढी येथील तलावात टाकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. यानंतर पोलिसांनी मैदान गढी येथील तलाव रिकामा करायला सुरुवात केली आहे.

या हत्याकांडाची रोज नवनवीन खुलासे समोर येतं आहेत. श्रद्धाची हत्या करूनही आफताब पोलिसांसमोर सामान्यपणे वावरत आहे. जणू काही घडलंच नाहीये, अशा पद्धतीने आफताब पुनावाला पोलिसांना उत्तर देत असल्याने पोलीसही संभ्रमात पडले आहेत. या प्रकारामुळे आफताब मानसिक रुग्ण असल्याची पोलिसांना शंका आहे. त्यातूनच त्याने हे कृत्य केलं असावं, असाही तर्क बांधला जातं आहे, अशी पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

हे ही वाचा : 

भारतीयांचा फोटो काढण्यास ‘ऑस्ट्रेलिया पोस्ट’चा नकार

पियुष गोयल म्हणतात, ट्विटरची जागा ‘या’ भारतीय अ‍ॅपने घ्यावी

नवले पुलावर भीषण अपघात, ट्र्कने ४७ वाहनांना उडवले

‘शिवाजी महाराजांनी माफी मागितली होती, असे वक्तव्य सुधांशू त्रिवेदींनी केलेलेच नाही’

आफताबने श्रद्धाच्या शरीराचे बहुतांश तुकडे हे छत्तरपूर येथील जंगलात फेकले होते. पण डोकं, धड आणि हाता पायाची बोटं कापून फ्रिजमध्ये ठेवली होती, अशी माहिती ‘अमर उजाला’ या संकेतस्थळावरील एका रिपोर्टमधून देण्यात आली आहे. त्याने हे सर्व तुकडे १८ ऑक्टोबर रोजी फेकल्याचही सांगितलं जातं आहे.

Exit mobile version