आफताबने केलेल्या मारहाणीमुळे श्रद्धा दोन वर्षांपूर्वी ‘ऍडमिट’ होती

श्रद्धाचे ताजे फोटो समोर आले आहेत ज्यात तिच्या गालावर आणि नाकावर जखमा आणि खुणा

आफताबने केलेल्या मारहाणीमुळे श्रद्धा दोन वर्षांपूर्वी ‘ऍडमिट’ होती

श्रद्धा वालकरच्या क्रूर हत्येनंतर आता या प्रकरणात दररोज नवीन नवीन तपशील समोर येत आहे. आफताब अमीन पूनावालाने दोन वर्षांपूर्वीही श्राद्धाला मारहाण केली होती. तिला तीन दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे तिच्या मित्रांनी सांगितले. श्रद्धाचे ताजे फोटो समोर आले आहेत ज्यात तिच्या गालावर आणि नाकावर जखमा आणि खुणा दिसत आहेत.

श्रद्धाला वसईच्या एका रुग्णालयात गंभीर पाठदुखी झाल्याबद्दल दाखल करण्यात आले होते. तिला ३ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाला वसईतील ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिच्या पाठीत आणि मणक्यामध्ये सुमारे एक आठवडाभर तीव्र वेदना होत होत्या. आफताबने तिला मारहाण केली आणि तिला पाठदुखीचा त्रास झाला असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

माझ्या आणि आफताबमध्ये खूप भांडणे आणि वाद होत असल्याचे तिने एकदा आपला मित्र लक्ष्मण नाडर याला सांगितले होते. “एकदा तिने माझ्याशी व्हॉट्सऍपवर संपर्क साधला आणि मला तिच्या राहत्या घरातून सोडवण्यास सांगितले. तिने सांगितले की जर ती त्या रात्री त्याच्यासोबत (आफताब) राहिली तर तो तिला ठार करेल,” असेही नाडर याने सांगितले.

 

हे ही वाचा : 

कर्नाटक सरकारचा ‘गो रक्षणा’साठी मोठा निर्णय

मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा

भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ

आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रकल्पांना स्थगिती

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब हा ड्रग्ज व्यसनी होता आणि त्या दिवशी त्याने श्रद्धाची हत्या केली तेव्हा तो ड्रग्जच्या प्रभावाखाली होता. आरोपींनी पोलिसांना सांगितले की, घरातील सामान मुंबईहून दिल्लीला हलवण्यावरून आणि दिवसभराच्या खर्चावरून या जोडप्यामध्ये वाद झाला, जो बराच काळ चालला. त्यानंतर तो अमली पदार्थांनी भरलेली सिगारेट ओढण्यासाठी बाहेर गेला आणि श्रद्धा त्याच्यावर ओरडत असल्याने त्याचा राग आला. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संतापलेल्या आफताबने श्रद्धाचा गळा दाबला आणि रात्रभर सिगारेट ओढली तरीही श्रद्धाचा मृतदेह समोरच पडला होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Exit mobile version