आफताब म्हणाला मला जामीन अर्ज दाखल करायचा नाही

वकिलांशी बोलून घेतला निर्णय

आफताब म्हणाला मला जामीन अर्ज दाखल करायचा नाही

मला जामीन अर्ज दाखल करायचा नाही असे श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबने न्यायालयाला सांगितले. आफताबचा जामीन अर्ज त्याच्या वकिलाच्या वतीने दाखल करण्यात आला होता, त्यानंतर कोर्टाने सांगितले की, यासाठी आफताबची संमती आवश्यक आहे. आफताबने आपल्या वकिलाशी बोलल्यानंतर जामीन अर्ज मागे घेतला. यानंतर न्यायालयाने याचिका मागे घेण्याची परवानगी देत ​​खटल्याची सुनावणी फेटाळून लावली.

तुरुंगात गेल्यानंतर आफताबशी ५० मिनिटे बोललो. मात्र यादरम्यान आफताबने न्यायाधीशांना आपली याचिका मागे घ्यायची असल्याचे सांगितले असे सुनावणीदरम्यान वकिलाने सांगितले. त्याचवेळी, आफताबचे वकील एमएस खान यांनी न्यायाधीशांना सांगितले की, थोडासा गैरसमज झाल्याने ही चूक झाली. आता हा प्रकार पुन्हा होणार नाही. कोर्टाने आफताबच्या वकिलाचे म्हणणे रेकॉर्डवर घेतले.

आरोपी आफताब अमीन पूनावाला याने साकेत न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतला आहे. आफताबच्या जामीन अर्जावरील सुनावणी सकाळी सुरू झाली. आफताबचे वकील अद्याप पोहोचले नव्हते, त्यामुळे साकेत कोर्टाने ११ वाजेपर्यंतची वेळ दिली होती. यापूर्वी १७ डिसेंबर रोजी आफताबला साकेत न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. श्रद्धाच्या वडिलांच्या वकिलाने सांगितले की, आफताबने त्याच्या वकिलाला जामीन अर्ज दाखल करण्यास नकार दिला आहे. त्यांनी जामीन अर्ज मागे घेतला आहे.

हे ही वाचा:

…म्हणून गुजरातमध्ये सर्वाधिक ड्रग्ज सापडले

ठाकरे गटाला धक्का, संजय राऊतांचे जामिनदारच शिंदे गटात

अपमान करून घेण्याची हौस…

मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!

दिल्ली पोलिसांनी साकेत कोर्टात आफताब पूनावालाच्या आवाजाचा नमुना घेण्याची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या अर्जावर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे. १७ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान आफताबने आपल्याला जामीन अर्जाबाबत माहिती नाही असे सांगितले होते.

Exit mobile version