दिल्लीत आफताब अमिन पूनावालाने श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या करून नंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याचे प्रकरण सध्या चर्चेत असताना श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी लिहिलेले पत्र आता हाती आले आहे.
हे पत्र तिने वसई पोलिसांना तिने लिहिले होते. त्यात आफताब आपल्याला ठार मारणार असल्याची भीती तिने व्यक्त केली होती. त्यानंतरही कोणतीही कारवाई आफताबवर झाली नव्हती. मात्र अखेर श्रद्धाने व्यक्त केलेली भीती आता खरी ठरली आहे.
श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी तुळींज पोलीस ठाण्यात आफताब विरोधात तक्रार दिली होती. श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी म्हणजे २३ नोव्हेंबर २०२० रोजी वसईतील तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात तिने “मला आफताबकडून जीवाला धोका आहे, तो माझी हत्या करून माझे शरीराचे तुकडे करू शकतो, असे श्रद्धाने आपल्या अर्जात लिहले होते. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला केवळ आफताब जबाबदार असेल अशी भीती श्रद्धा वालकर हिने त्या अर्जात व्यक्त केली होती.
हे ही वाचा:
दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? सीबीआय तपासात झाले उघड
लोकांची सेवा करतोय तोपर्यंत सरकार टिकेल
आसाम-मेघालय सीमेवर हिंसाचार, गोळीबारात ६ जणांचा मृत्यू
नशीब बलवत्तर… न्यूझीलंडचे ‘टाय टाय’ फीश
दरम्यान पोलिसांनी आफताबला बोलावून त्याला समज देऊन सोडून दिले होते, आफताबने श्रद्धाला लग्न करण्याचे सांगत ही तक्रार मागे घेण्यास सांगितले होते. त्यानंतर श्रद्धाने तक्रार मागे घेतली होती, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. याबाबत दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू असून याबाबत दिल्ली पोलिसांकडून आफताबकडे चौकशी करण्यात येणार आहे.