श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणामुळे संपूर्ण भारत हादरला आहे. हा हत्याकांड उघडकीस येऊन आता बरेच दिवस झाले आहेत. या हत्याकांडातून नव-नवे खुलासे समोर येत आहेत. मारहाणीमुळे श्रद्धा वालकरने तिच्या लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पण आफताब नाराज होता, त्यामुळे पूर्ण कटानुसार श्रद्धाला दिल्लीत आणून श्रद्धाची हत्या करण्यात आली.
आफताब अनेकदा श्रद्धासोबत भांडण करायचा तेव्हा तिने आफताबला सोडण्याचा निर्णय घेतला. तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये आफताबपासून वेगळे व्हायचे होते. श्रद्धाने आफताबसमोर ब्रेकअपची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यानंतर ४ मे रोजी दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आफताबला श्रद्धाचे म्हणणे मान्य नव्हते. त्यामुळे आफताबने श्रद्धाच्या हत्येचा कट रचला आणि पूर्वनियोजित दिल्लीत येऊन श्रद्धाची हत्या केली, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
पोलीस पथकाने आतापर्यंत मेहरौली आणि आसपासच्या जंगलातून १३ हाडे जप्त केली आहेत. ही हाडे डीएनए चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. विशेष आयुक्त कायदा व सुव्यवस्था दीपेंद्र कुमार हुडा यांनी मंगळवारी पोलिस मुख्यालयात अधिकृतपणे ही माहिती दिली. डीएनए अहवालातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे त्यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा :
अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास
नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका
शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार
राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब
दरम्यान, मुंबईतील श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची १ डिसेंबर रोजी नार्को चाचणी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. यापूर्वी ५ डिसेंबरला नार्को चाचणी घेण्याचे ठरले होते, मात्र आता १ डिसेंबरला नार्को चाचणी घेण्याची तयारी सुरू झाली आहे.