अठरा वर्षानंतर जे स्वातंत्र्य दिले जाते त्यावर विचार व्हायला हवा तसेच धर्मजागृती करण्यावर भर दिला पाहिजे अशी मागणी श्रद्धा वालकरच्या वडिलांनी केली आहे. श्रद्धा वालावलकर हत्याकांड प्रकरणी न्याय मिळावा यासाठी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या व्यथा मांडल्या. भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील यावेळी उपस्थित होते माझ्या मुलीचे जे झाले ते अत्यंत दुःख दायक असून यापुढे असे कोणाचेही होऊ नये अशी माझी अपेक्षा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
विकास वालकर म्हणाले की , माझी मुलगी श्रद्धा वालकर हिच्या दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचे मला व माझ्या कुटुंबियांना अत्यंत दुःख झाले आहे. ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे माझी प्रकृती थोडी खराब झाली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल दिल्ली पोलीस व वसई पोलिस यांचे काम संयुक्तपणे व्यवस्थित चालले आहे. माझ्या मुलीला न्याय मिळावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. श्रद्धा वालकर प्रकरणात दोषींवर कठोरातील कठोर कारवाई होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे वालकर यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा :
भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार
मुलानेच ७० वर्षीय आईची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, पण
हॉटेलमध्ये शिजला कापड व्यवसायिकाच्या हत्येचा कट
नाशिककरांची ८ तारीख ठरली ‘अपघाताची’
न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास
अगदी सुरुवातीस वसई येथील तुळींज पोलिस स्टेशन आणि वसई माणिकपूर पोलीस स्टेशन यांच्या काही सहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा असा आरोप करून वालकर यांनी त्याची चौकशी करावी अशी मागणी केली. तसे झाले नसते तर आज माझी मुलगी जिवंत असती किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती. मला माझ्या मुलीसाठी न्याय मिळावा यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य हवे. न्यायव्यवस्थेवर माझा संपूर्ण विश्वास आहे आणि राहील असे वालावलकर यांनी सांगितले.
आफ्ताबच्या कुटुंबीयांची चौकशी व्हावी
आफताब पुनवाला याने माझ्या मुलीची अत्यंत क्रूरतेने हत्या केली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. त्याच्या कुटुंबातील त्याचे आई वडील व भाऊ यांचीही सखोल चौकशी करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. या कटात इतर कोणी सामील असतील तर त्यांचीही चौकशी करून त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.
आफताबच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ
श्रद्धा खून प्रकरणात आफताब पूनावालाच्या अडचणी वाढल्या आहेत. शुक्रवारी दिल्लीच्या साकेत कोर्टाने आफताबच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. आफताब सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे आणि त्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजेरी लाव