दिल्लीतील जंगपुरा येथील ज्वेलर्सच्या शोरूममध्ये कोट्यवधींची चोरी झाली आहे. दुकानात ठेवलेले २० ते २५ कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेल्याचं शोरूम मालकाने सांगितले.चोरटयांनी शोरूमचं छप्पर कापून आत प्रवेश केला आणि कोट्यवधी रुपयांचे दागिने लंपास केले.
दिल्लीतील जंगपुरा येथील उमराओ सिंह ज्वेलर्स शोरूममधून २५ कोटींची चोरी झाली आहे.शोरूमचं छप्पर कापून दुकानात प्रवेश करत चोरटयांनी हिरे दागिने चोरल्याने भागात एकच खळबळ उडाली.उमराव सिंह आणि महावीर प्रसाद जैन यांच्या मालकीचे हे शोरूम आहे.दुकानात २० ते २५ कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने ठेवण्यात आल्याचं शोरूम मालकानं सांगितलं आहे.
हे ही वाचा:
घाऊक विक्रेत्यांच्या तूर, उडीद डाळीचा साठा आता २०० वरून ५० टन
भुजबळ-पवार हेच महात्मा फुलेंच्या विचारांचे मारेकरी
एअर इंडियाच्या फ्लाईट अटेंडन्ट आता साडीत दिसणार नाहीत!
वहिदा रहमान यंदाच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी
शोरुम मालकांनी दिलेल्या माहितीनुसार,जंगपुरा बाजार सोमवारी बंद असतो.त्यामुळे रविवारी शोरूम बंद करून आज (मंगळवारी) शोरुम उघडण्यासाठी गेले. दुकानाचं टाळं उघडल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि त्यांना धक्का बसला.त्यानी सांगितले, दार उघडलं त्यावेळी एकही दागिना शोरूममध्ये नव्हता. शोरूममध्ये ठेवण्यात आलेले सर्वच्या सर्व दागिने चोरट्यांनी लंपास केले होते.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी छत कापलं आणि तिथून शोरूममध्ये प्रवेश केला आणि हात साफ केला.
दरम्यान, चोरट्यांनी दुकानात प्रवेश करण्यासाठी छत कापलं होत त्याठिकाण्याची व्हिडीओ क्लिपही समोर आली आहे.परंतु, चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही फुटेज अद्याप समोर आले नाहीत.