गोळीबारात कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा मृत्यू

पोलिसांकडून तपास सुरू

गोळीबारात कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा मृत्यू

पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या कोथरुड परिसरात गोळीबार करण्यात आला आहे. शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळला कोथरुडमधीलच खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

शुक्रवार, ५ जानेवारी रोजी भर दुपारी कोथरुडमध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली. कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आहे. पूर्ववैमन्यास्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गोळीबार झाल्यानंतर कोथरुड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा:

भारत-नेपाळ संबंधांना मिळाली नवी ‘ऊर्जा’ ; जलविद्युत मेगा करार

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर २०० तोफगोळे डागले

हिजबुलचा वॉन्टेड दहशतवादी जाविद अहमद मट्टू दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!

राज्यसभेच्या ६८ खासदारांचा सन २०२४ मध्ये कार्यकाळ संपणार

शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आला होता. पण दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केल्याप्रकरणात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्यावर अनेक गुन्ह्याची नोंद आहे.

Exit mobile version