काल जगभर एकीकडे जागतिक महिला दिनाचा आनंद साजरा होत असतानाच वसईत मात्र महिलांच्या विरोधातील गंभीर गुन्हा समोर आला आहे. वसईतील राजोडी भागात ही घटना घडली असून महिलांच्या एका हॉटेलला अज्ञातांनी आग लावली आहे. महिलांच्या बचट गटाच्या माध्यमातून हे हॉटेल चालवले जात होते.
जवळपास २० ते २५ महिलांच्या बचत गटामार्फत हे हॉटेल चालवले जात होते. पण सोमवार, ७ मार्च रोजी अज्ञातांनी या हॉटेलला आग लावल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोमवारी रात्री अंधाराचा फायदा घेत राजोडी समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या फॅमिली कट्टा या हॉटेलला अज्ञातांनी पेटवून दिले. हॉटेलचा दरवाजा तोडून पेट्रोल टाकून काही अज्ञात इसमांनी हॉटेलला आग लावली.
हे ही वाचा:
सरकारी वकिलांचे कार्यालय की राजकीय कत्तलखाना!
विरोधकांना अडकवण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सरकारी’ कट!
हजारो पात्र खातेदारांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नाही
महिलांवर अत्याचार करणाऱ्या तालिबानकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
या घटनेत हॉटेलमध्ये असलेले लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे. गरिब घरातील महिला बचतगटाच्या माध्यमातून हे हॉटेल चालवत होत्या. एक एक पैसा जमा करून, तर कोणी आपलं स्त्रीधन गहाण ठेवून या महिलांनी हे हॉटेल सुरू केले होते. मात्र अज्ञात इसमांनी लावलेल्या आगीत ते जळून खाक झाले आहे. या कृत्याविषयी महिलांमधून संताप व्यक्त केला जात आहे.