शहापुरात ज्वेलर्सबाहेर गोळीबार,कामगाराचा मृत्यू!

पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरु

शहापुरात ज्वेलर्सबाहेर गोळीबार,कामगाराचा मृत्यू!

ठाण्यातील शहापूरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

शहापूर तालुक्यातील पंडित नका येथील बाजारपेठेत असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर शनिवारी (२१ डिसेंबर) रात्री गोळीबार झाला. दोन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर येवून गोळीबार केला. या गोळीबारात ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाला. दिनेश चौधरी असे मृत कामगाराचे नाव आहे.

गोळीबार करून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. हल्ल्यात दिनेश चौधरीच्या छातीत गोळी लागली. त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा : 

घाटकोपरमध्ये पाण्याच्या टाकीत पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर, गृहखाते फडणवीसांकडेच, शिंदेकडे नगरविकास खाते

फरार वाल्मिकी कराडवर बुलडोजर चालणार?

महाराष्ट्राला प्रगत, समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार अहोरात्र काम करेल

 

Exit mobile version