33 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरक्राईमनामासोनीपतमध्ये दिवसाढवळ्या व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या!

सोनीपतमध्ये दिवसाढवळ्या व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या!

तब्बल ३५ राउंड फायर, या गँगस्टरने स्वीकारली जबाबदारी

Google News Follow

Related

हरियाणातील सोनीपतमध्ये रविवारी (१० मार्च) एका ढाब्याच्या बाहेर एका दारू व्यावसायिकावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे. सुंदर मलिक असे मृताचे नाव असून गोळीबाराची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुलशन धाब्याच्या मागे असलेल्या पार्किंगमध्ये व्यावसायिक सुंदर मलिक यांच्यावर दोन व्यक्ती अंदाधुंद गोळीबार करताना दिसत आहेत. गोळीबार करणाऱ्यांनी सुंदर मलिकवर ३५ हून अधिक गोळ्या झाडल्याचं समजतं.

हरियाणातील हिमांशू उर्फ ​​भाऊ या गँगस्टरने सुंदर मलिकच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.हिमांशू उर्फ ​​भाऊ हा भारताबाहेर राहत असल्याचे मानले जात असून इंटरपोलने गेल्यावर्षी त्याच्याविरुद्ध रेड नोटीस जारी केली होती.सोनीपतचे पोलिस उपायुक्त गौरव राजपुरोहित यांनी सांगितले की, व्यापारी सुंदर मलिकला गोळ्या घालण्यापूर्वी दोन ते तीन जण होंडा सिटी कारमधून उतरताना दिसले.

हे ही वाचा:

क्रिस्टिना पिस्कोव्हाने पटकावला ‘मिस वर्ल्ड २०२४’चा खिताब!

कुनो पार्कमधील ‘गामिनी चित्त्या’ने दिला पाच शावकांना जन्म!

ताठरपणा गेला, चेहऱ्यावर तणाव, सीबीआयच्या ताब्यात येताच शाहजहान शेखचे हावभाव बदलले!

राजस्थानमध्ये काँग्रेसला खिंडार, माजी मंत्र्यांसह ३२ जणांचा भाजपात प्रवेश!

या हत्येच्या तपासासाठी सात पोलीस पथके तयार करण्यात आली असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, सुंदर मलिकची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी पोलीस त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुण सुंदर मलिक यांच्या पार्क केलेल्या एसयूव्हीकारकडे धाव घेताना दिसत आहेत. सुंदर मलिक हे कारमध्ये बसलेले असताना त्यांना बाहेर ओढून दोन्ही तरुण त्यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहेत.सुंदर मलिक पळून जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र गोळीबार करणाऱ्यांनी त्यांच्यावर अनेक वेळा गोळीबार केला.या गोळीबारात मलिक याचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसत आहे.दरम्यान, सुंदर मलिक याच्यावर देखील खून आणि खुनाचा प्रयत्न असे गंभीर आरोप असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याची नुकतीच जामिनावर तुरुंगातून सुटका झाली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा